दहावीच्या परीक्षेत तोतया परीक्षार्थी व त्या विध्यार्थ्यावर गुन्हा दाखल
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ तालुक्यातील माधवाश्रम विद्यामंदिर खडका या केंद्रात इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी मूळ विद्यार्थी न बसता त्याठिकाणी तोतया विद्यार्थी बनून दुसऱ्याच विद्यार्थ्याला परीक्षा देत असताना सोमवार दिनांक 16 मार्च 2020 रोजी संबंधित पर्यवेक्षक शिक्षकांनी पकडले असून सदरील शाळेचे मुख्याध्यापक तथा केंद्र संचालक रमाकांत बुरांडे यांच्या फिर्यादीवरून दोन्ही विद्यार्थ्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या सर्वत्र इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षा सुरळीत सुरू असतानाच तालुक्यातील माधवाश्रम विद्यामंदिर खडका या शाळेमध्ये दहावीच्या परीक्षेसाठी हॉल क्र.6 मध्ये k169144 या परिक्षा क्रमांकाच्या "सचिन प्रेमचंद राठोड" विद्यार्थ्याच्या जागेवर बसून "सुमित अर्जुन काळे" हा तोतया विद्यार्थी बनून दहावी बोर्डाच्या विज्ञान विषयाची परीक्षा सोमवार रोजी देत होता. यावेळी सदरील हॉलवर पर्यवेक्षक म्हणून कार्यरत असलेले शिक्षक व्हि.जी.चव्हाण यांनी तोतया बनुन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यास हेरले व तात्काळ त्याच्याकडील प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका हिसकावून घेत त्यास मुख्याध्यापकांच्या स्वाधीन केले. या झाल्या प्रकाराची खबर मुख्याध्यापक तथा केंद्र संचालक रमाकांत बुरांडे यांनी तात्काळ गटशिक्षणाधिकारी शौकत पठाण व परभणीचे नियंत्रण अधिकारी कांबळे यांना भ्रमणध्वनीवरून दिली. यांच्या आदेशावरून माधवाश्रम विद्यामंदिर खडकाचे मुख्याध्यापक तथा केंद्र संचालक रमाकांत बुरांडे यांनी शाळेचा मूळ परीक्षार्थी विद्यार्थी "सचिन प्रेमचंद राठोड" व त्याचे जागेवर तोतया परीक्षार्थी बनून परीक्षा देणारा "सुमित अर्जुन काळे" या दोन्ही विद्यार्थ्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यांच्या तक्रारीवरून भा. द. वि. कलम 419 प्रमाणे परीक्षेचा गैरवापर केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास बीट जमादार आत्माराम पवार हे करत आहेत.

No comments:
Post a Comment