Sunday, March 29, 2020

एकही गरजू व्यक्ती उपाशी राहणार नाही -जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांचे विविध सेवाभावी संस्थाना आवाहन

एकही गरजू व्यक्ती उपाशी राहणार नाही -जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांचे विविध सेवाभावी संस्थाना आवाहन




परभणी / सोनपेठ (दर्शन) :-  कोरोनाच्या  परिस्थितीमुळे जिल्ह्यासह इतर राज्यातील एकही व्यक्ती, मजूर, हमाल, रोजंदारी  कर्मचारी उपाशी राहणार नाही याची काळजी घ्यावी.
कोरोनाच्या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकारी श्री. मुगळीकर यांनी जिल्ह्यातील विविध सेवाभावी संस्थांची आढावा बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक , निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे,  उपजिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, डॉ. संजय कुंडेटकर , महापालिका सहाय्यक आयुक्त अल्केश देशमुख सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे, तहसीलदार विद्याचरण कडवकर आणि विविध सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या परिस्थितीमध्ये परराज्यातील कामगार व जिल्ह्यातील एकही व्यक्ती उपाशी राहणार नाही, यासाठी विविध सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेऊन सर्व गरजूंना जीवनावश्यक वस्तू व अन्न उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हाधिकारी श्री. मुगळीकर यांनी आवाहन केले. तसेच विविध सेवाभावी संस्थेकडून व नागरिकांकडून मदत स्वीकारणे व वितरण करणे व त्यांच्यात समन्वय साधणे इत्यादींसाठी जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली आहे या कक्षाचे प्रमुख व सेवाभावी संस्थांचे प्रमुख यांचा ताळमेळ घालून देण्यात आला जेणेकरून गरजुन पर्यंत जीवनावश्यक वस्तंचे वितरण व्यवस्थित व्हावे..
000000
 

No comments:

Post a Comment