राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पॅलिएटिव्ह केअर सेंटर सुरु करणार - आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
कर्करोग, एच आय व्ही बाधित तसेच दुर्धर आजारी असलेल्या रुग्णांची विशेष काळजी घेण्यासाठी विशेष उपचार केंद्र ‘पॅलिएटिव्ह केअर सेंटर’ हे राज्यात 17 जिल्ह्यात स्थापन झाले असून येत्या दोन वर्षात उर्वरित 19 जिल्ह्यात सुरु करण्यात येतील,अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधान परिषदेत प्रशनोत्तराच्या तासाला दिली.
श्री. टोपे पुढे म्हणाले, केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पॅलिएटिव्ह केअर कार्यक्रमा अंतर्गत टप्या टप्याने हा कार्यक्रम कार्यान्वित करण्यात येत आहे. यासाठी आवश्यक असणारे औषधे, लागणारा कर्मचारी वर्ग त्याचबरोबर निधीची कोणतीही कमतरता यासाठी होणार नाही. जिल्हा रुग्णालयात पॅलिएटिव्ह केअर साठी दहा खाटा वेगळ्या ठेवण्यात आल्या आहेत. त्याच प्रमाणे यासाठी विशेष डॉक्टर आणि प्रशिक्षीत परिचारीकांची नियुक्ती करण्यात येत आहे. यासंदर्भातील अभ्यासक्रमही लवकरच सुरु करू असेही श्री.टोपे यानी एका उपप्रश्नाला उत्तर देतांना सांगितले.उपरोक्त प्रश्नाच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री. जगन्नाथ शिंदे, डॉ. रणजीत पाटील, हेमंत टकले, गिरिशचंद्र व्यास आदिंनी सहभाग घेतला होता.
No comments:
Post a Comment