परभणीकर कोरोना ची लढाई घरातुनच जिंकनार तमाम जनतेनी पोलीस, डॉक्टर, प्रशासकीय कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे - राजेश विटेकर ; कोरोना महामारीला सहज घेऊ नका, गांभीर्य ओळखा
सोनपेठ (दर्शन) :-
कोरोना महामारी हि जागतिक महामारी म्हणून समोर आली आहे. जगात नावाजलेल्या चीन, इटली, जर्मनी, अमेरिका या देशाची कोरोना व्हायरस मुळे दयनीय अवस्था झाली आहे. प्रशासनाने आव्हान करूनही नागरिक गांभीर्याने विचार करत नाहीत.आज एक दिवसीय बंद म्हणजे अब्जावधी रुपयाचे नुकसान परंतु नागरिकांच्या आरोग्याचा पुढे काहीही मोठे नाही म्हणून नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन. आपल्या कुटुंबाला सोडून रात्रंदिवस नागरिकांची सेवा करणाऱ्या प्रतेक पोलीस कर्मचारी, डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी , अंगणवाडी सेविका, आशाताई, ग्रामसेवक, तलाठी, महावितरण कर्मचारी, पाणीपुरवठा कर्मचारी, सफाई कर्मचारी , महसूल कर्मचारी हे आपले घरदार सोडून नागरिकांच्या आरोग्याची सुरक्षितता राहावी म्हणून रात्रंदिवस कार्य करतात या सर्व पोलीस, आरोग्य, महावितरण, पाणीपुरवठा व इतर सर्व कर्मचाऱ्यांना नागरिकांनी सहकार्य करावे तसेच महामारीत स्वार्थी व्यापाऱ्यांनी जीवनावश्यक वस्तूची साठेबाजी करून नफेखोरी करू नये या महामारीच्या विरोधी लढाई आपण परभणीकरांनी म्हणजेच परभणी जिल्ह्यातील तमाम नागरिकांनी एक जुटीने शासकीय, प्रशासकीय कर्मचाऱ्यांना मदत , सहकार्य करावे तसेच परभणीकर कोरोना ची लढाई घरातुनच जिंकनार असे आवाहन मा.जि.प.अध्यक्ष तथा सभापती राजेश विटेकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.एवढेच नाही तर माझ्या वाढदिवस हि घरी थाबुनच साध्या पद्धतीने साजरा करणार असुन कोनीही हार, तुरे घेऊन भेटायला येऊ नये हि मनपुर्वक आपैक्षा असे त्यांनी सा.सोनपेठ दर्शन प्रतिनिधी जवळ सांगीतले.

No comments:
Post a Comment