वन्यजीवांच्या अस्तित्वावर मानवाचे अस्तित्त्व अवलंबून आहे- प्राचार्य डॉ.वसंत सातपुते
सोनपेठ जैवविविधता ही पर्यावरणाशी सलंग्नित बाब असून अन्न साखळी पेक्षा नैसर्गीकरित्या सर्व सजीव एकमेकांवर अवलंबून असतात.वन्यजीवांच्या अस्तित्वावरचं मानवाचे अस्तित्व अवलंबून आहे, असे मत प्राचार्य डॉ.वसंत सातपुते यांनी यावेळी व्यक्त केले.शहरातील
प्राणिशास्त्र विभागात आयोजीत वन्यजीव दिनानिमीत्तच्या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना ते बोलत होते.कै.र. व.महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभागाच्या वतीने वन्यजीव दिनाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उद्घाटक प्रा.अंगद फाजगे, प्रमुख पाहूणे म्हणून गोविंद वाकणकर,प्रा.विकास रागोले हेउपस्थीत होते.यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. वसंत सातपुते यांनी वन्यजीवांचे पृथ्वीवरील अस्तित्व हे महत्त्वाचे असून निसर्गाने एकमेकावर आधारीत रचना बनवलेली आहे, त्यामुळे त्यांचे संवर्धन व त्याविषयक जागृती आवश्यक आहे,असे प्रतिपादन त्यांनी केले.
यावेळी प्राणीशास्त्र विभागातील गायत्री तोंडगे, चैत्राली गव्हाणे, ऋतुजा भोसले, कोमल भोसले, राधा गव्हाडे, योगेश्वरी गव्हाणे आदी विद्यार्थीनींनी वन्यजीवांविषयी माहीती दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जना तोंडगे, प्रास्ताविक ऐश्वर्या गलांडे, आभार शिवकन्या तोंडगे यांनी मानले,कार्यक्रम प्रसंगी
प्राणिशास्त्र विषयाचे प्राध्यापक मंडळी ही उपस्थित होते.
No comments:
Post a Comment