Monday, March 2, 2020

ना.धनंजय मुंडेंच्या प्रयत्नांतून कमी ऐकू येणाऱ्या / कर्णबधिर रुग्णांसाठी मोफत डिजिटल श्रवणयंत्र वाटपासाठी पूर्व तपासणी शिबिराचे आयोजन : डॉ. संतोष मुंडे {प्रत्येक व्यक्तीला देण्यात येणाऱ्या श्रवण यंत्राची अंदाजे किंमत रू २५ हजार}

ना.धनंजय मुंडेंच्या प्रयत्नांतून कमी ऐकू येणाऱ्या / कर्णबधिर रुग्णांसाठी मोफत डिजिटल श्रवणयंत्र वाटपासाठी पूर्व तपासणी शिबिराचे आयोजन : डॉ. संतोष मुंडे




परळी / सोनपेठ (दर्शन) :- 

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांतून ६ व ७ मार्च रोजी श्रीनाथ हॉस्पिटलमध्ये कमी ऐकू येणाऱ्या / कर्णबधिर रुग्णांसाठी मोफत डिजिटल श्रवणयंत्र वाटपासाठी पूर्व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती शिबीर संपर्क प्रमुख तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे (मोबाईल नं. 9822280568) यांनी दिली आहे.

मुंबईचे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, बीड जिल्हा आरोग्य विभाग, नाथ प्रतिष्ठान, धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजना व स्टार की फाउंडेशन अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू रुग्णांना हे डिजिटल श्रवण यंत्र वितरित केले जाणार आहेत. वाटप पूर्व तपासणी शिबिरासाठी नावं नोंदणी २ मार्च ते ६ मार्च दरम्यान श्रीनाथ हॉस्पिटलमध्ये करावी असे आवाहन शिबिर संपर्क प्रमुख डॉ. संतोष मुंडेंनी केले आहे.

ज्यांनी नावं नोंदणी केली आहे अशा रुग्णांची तपासणी दि. ६ व ७ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेदरम्यान श्रीनाथ हॉस्पिटल येथे केली जाईल. दिव्यांगांसाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या ना. धनंजय मुंडेंच्या प्रयत्नांतून आयोजित केलेल्या या शिबिराचा कमी ऐकू येणाऱ्या / कर्णबधिर, जेष्ठ नागरिक, महिला तथा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन शिबिर संपर्क प्रमुख संतोष मुंडेंनी केले आहे.

{प्रत्येक व्यक्तीला देण्यात येणाऱ्या श्रवण यंत्राची अंदाजे किंमत रू २५ हजार}

पंचक्रोशितील बातम्या साठि संपर्क सा.सोनपेठ दर्शन संपादक किरण स्वामी सोनपेठ मो.9823547752.

No comments:

Post a Comment