जीवनावश्यक वस्तूंचा मुबलक साठा उपलब्ध, नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी करू नये
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात 21 दिवसांचे लॉकडाऊन सुरू झाले असून या काळात नागरिकांना भाजीपालासह इतर जीवनावश्यक वस्तू उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासनाने आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत.
लॉकडाऊनच्या कालावधीत जिल्ह्यात भाजीपाला, अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा याकरिता जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात असून किराणा दुकानांसमोर ग्राहकांची गर्दी होवू नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. जनतेला सोशल डिस्टन्सींगचे महत्व पटवून दिले जात असून ठराविक अंतरावर ग्राहकांनी शिस्तीत थांबून आपल्या सामानाची खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी किराणा दुकानासमोर ठराविक अंतरावर मार्कींग करून सामानाची खरेदी केली जात आहे. यासाठी जिल्हा प्रशासन, महानगरपालिका अधिकारी-कर्मचारी व आरोग्य विभागामार्फत दुकानदार व ग्राहकांना सुचना देण्यात येत आहेत. तसेच जीवनावश्यक वस्तुंचा मुबलक प्रमाणात साइा उपलब्ध असून नागरिकांनी खरेदी करण्यासाठी दुकानांवर गर्दी करू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment