Wednesday, March 18, 2020

परभणी जिल्हा म्हनजे प्रभावतीनगरी ; प्रभावतीची प्रगल्भता उपेक्षितच राहिली..!

परभणी जिल्हा म्हनजे प्रभावतीनगरी ; प्रभावतीची प्रगल्भता उपेक्षितच राहिली..!


परभणी हे नाव ऐकताच इतर भागातील लोकांच्या चेहऱ्यावर परभणीच्या मागासलेपणाचे भाव दिसून येतात. ही खूप मोठी खंत असली तरीही जिल्ह्याची भौगोलिक पाहणी केल्यास, प्रभावती नगरीची प्रगल्भता दिसून येते.
परभणी जिल्हा महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागात येतो. मराठवाड्यातील इतर भागांप्रमाणेच हा जिल्हा प्रथम निजामाच्या अधिपत्याखाली होता. परभणीला आधी प्रभावतीनगर असे म्हणत. परभणी जिल्ह्याच्या उत्तरेस हिंगोली जिल्हा, पूर्वेस नांदेड जिल्हा, दक्षिणेस लातूर जिल्हा व पश्चिमेस बीड जिल्हा व जालना जिल्हा आहेत. परभणी महाराष्ट्राच्या इतर महत्वाच्या शहरांशी तसेच शेजारील आंध्र प्रदेश राज्याला रस्त्याने जोडला गेला आहे. परभणी जिल्ह्याचे क्षेत्रफळ ६२५०.५८ चौ.कि.मी आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडे अजंता डोंगररांगा आहेत तर दक्षिणेकडे बालाघाट डोंगररांगा आहेत. 

परभणीत मराठवाडा कृषी विद्यापीठ हे भव्य विद्यापीठ आहे. याचे नाव वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ आहे. तसेच परभणी पासून जवळच पाथरी येथे शिर्डी साईबाबा यांचे जन्मस्थळ आहे, तेथे त्यांचे मंदिर सुध्दा आहे. तर ञिधारेला तीन धारांचा संगम झालेला असून येथे ओँकारनाथ भगवान या सिध्दपुरुषाचे मंदिर आहे. तर परभणीपासून जवळच गंगाखेड हे तालूक्याचे ठिकाण आहे. गंगाखेड ही संत जनाबाईंची जन्मभूमी असल्यामुळे येथे जनाबाईची समाधी आहे. तसेच गंगाखेडजवळून गोदावरी ही नदी वाहते. या गोदावरी नदीच्या पात्रात अनेक छोटी मोठी मंदिरे आहेत. काही मंदिरे ही नदीच्या पात्रात आहेत तर काही नदी पात्रापासून थोड्या उंचीवर स्थित आहेत. संत नामदेव महाराज (नर्सी). जिंतुर शहरालगत नेमगिरी हे जैन तीर्थस्थान असून तेथे तीर्थंकर नेमिनाथाची प्राचीन मूर्ती आहे. परभणी जिल्ह्यात गणिताचे महर्षी म्हटल्या जाणारे भास्कराचार्य हे याच जिल्ह्यातील बोरी येथील आहेत. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक औंढा नागनाथ हे पूवी परभणीतच होते, आता हे स्थान हिंगोली जिल्ह्यात आहे. त्याचप्रमाणे जिंतूर तालुक्यातील पाचलेगाव या गावी राष्ट्रसंत संचारेश्वर पाचलेगावकर महाराजांचा जन्म झाला, त्यामुळे हे ही एक पवित्र स्थान या जिल्ह्यात आहे. ञिधारा हे पवीञ ठिकाण येथे आहे.ञिधारेला ओँकारनाथ भगवान नामे सिध्दपुरुषाचे मंदिर आहे.त्यांनी यवतमाळ मधील कार्ला येथे समाधी घेतली. परभणी शहराजवळ दत्तधाम हे दत्ताचे पीठ आहे. जिल्ह्याला नृसींह पोखर्णी तिल नरसिंहाचे भव्य मंदिर प्रेक्षणीय स्थळ आहे, याव्यतिरिक्त परभणी परभणी शहरातील आणखी एक महत्वाचे ठिकाण म्हणजे पारधेश्वर महादेव मंदिर. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरातील शिवलिंग आहे. हे शिवलिंग पाऱ्यापासून (Mercury) बनलेले आहे. पारा हा साधारण तापमानामध्ये द्रव स्वरूपात असतो, परंतु हे एकमेव शिवलिंग आहे जे स्थायु स्वरूपात असून ते पाऱ्यापासून बनलेले आहे, म्हणून या शिवलिंगाला पारद शिवलिंग असेही म्हणतात. परभणी शहरात तुराबुल हक पीर यांचा दर्गा आहे. फेब्रुवारी महिन्याच्या २ तारखेला  दर्ग्यामध्ये उरूस  भरतो. हा उरूस १० ते १२ दिवस चालतो. या उरुसामध्ये दर्ग्याच्या आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारची दुकाने मांडली जातात, ज्यामध्ये खेळणी, आकर्षक वस्तू, गृहोपयोगी वस्तू, खाद्यपदार्थ, मनोरंजनाच्या वस्तू इत्यादी अनेक प्रकारच्या वस्तूंचा समावेश असतो. तसेच वेगवेगळी कलाप्रदर्शने, क्रीडा व इतर कौशल्यांची प्रदर्शने केली जातात. अशी  परभणी जिल्ह्यात बरीचशी जागृत धार्मिक स्थळे आहेत... 

जिल्ह्यात गोदावरी नदी, पुर्णा नदी व दुधना नदी या प्रमुख नद्या आहेत तर इतर कर्परा नदी व मासळी नद्या पण आहेत. या नद्यांवरील नावाजलेली धरणही तितकीच आकर्षक आहेत येलदरी धरण, लोअर दुधना धरण, पुर्णा सिध्देश्वर धरण, कर्परा धरण आशी मनमोहक धरणही जिल्ह्यात आहेत. जिल्ह्यातील पालम येथे गोदावरी नदी पात्राच्या मधोमध आकर्षक व प्रेक्षणीय जांभूळबेट नावाने बेट आहे. जिंतुरापासून २८ कि.मी. अंतरावर कोठा हे निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध गाव वसले आहे.

एवढा सगळा प्रगल्भ वारसा असलेला जिल्ह्याला विकासात गंध लागेनासा झालाय, जिल्ह्याला आरोग्य, शिक्षण, रस्ते, पिण्याचे पाणी, राहण्यासाठी घरे, स्वच्छता, शिस्त, शेती विकास, इलेक्ट्रिसिटी समस्या, चोरांपासून सुरक्षितता, भाईगिरीचे वाढते प्रमाण, बाजारपेठांची कमतरता, प्रशासकीय अस्थिरता, बेजबाबदार आधीकारी, लाचखोरी, राजकीय अस्थिरता व राजकीय दडपशाही, या व अशा अनेक आजारांनी हा जिल्हा जंग जंग ग्रासलेला आहे. या सर्व राक्षसी थैमानातून प्रभावती नगरीची प्रगल्भता अबाधित ठेवण्यासाठी कधी आजार रुपी ग्रहण जिल्ह्या वरून एकदाचे सुटते आणि जिल्ह्याला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणारी पाहट कधी उजाडेल कोण जाणे.

एवढी प्रगल्भता असणारा जिल्हा आज इतरांच्या नजरेत मागासलेपणाचेच दर्शन घडवत आहे. हे चित्र बदलण्यासाठी आपल्या सर्वांना समोर यावं लागणार आहे. आणि जिल्ह्याला लागलेल्या या शापातून मुक्ती देण्यासाठी लढावं लागणार आहे. हे काम माझे एकट्याचे नाहीये किंवा त्याच एकट्याचे नाहीए. हे आपल्या सर्वांचे आपल्या परभणीकरांचे काम आहे.. 

शब्दाकंन - विराट शिंदे.

No comments:

Post a Comment