सोनपेठ तालुक्यात दहावीच्या परीक्षेस शांततेत व कॉपीमुक्त सुरुवात ; 1036 विध्यार्थी व विध्यार्थींनी मिळुन देत आहेत परीक्षा
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ तालुक्यात एकूण 4 केंद्रावर 44 हॉल मध्ये एकूण 1036 विद्यार्थी व विद्यार्थिनी मिळून दहावीची परीक्षा शांततेत व कॉपीमुक्त वातावरणात सुरुवात झालेली दिसते.प्रारंभ दि.3 मार्च 2020 मराठी विषय तर समाप्ती दि.23 मार्च 2020 भुगोल या विषयाचा पेपर सोडून होनार आहे.सोनपेठ शहरातील जिल्हा परिषद प्रशाला शाळेत केंद्र प्रमुख धिवार के.बी. यांच्या मार्गदर्शनात 8 हॉल मध्ये 192 विद्यार्थी व विद्यार्थिनी मिळून दहावीची परीक्षा देत आहेत तर या ठिकाणी बैठे पथकात कानडे,धुमाळ, दिवे, रोड व पाटील आदींची नियुक्ती केलेली आहे. दुसरे शहरातील केंद्र श्री महालिंगेश्वर विद्यालय येथील केंद्र प्रमुख भोसले ए.बी.यांच्या मार्गदर्शनात 12 हॉल मध्ये 281 विद्यार्थी व विद्यार्थिनी मिळून दहावीची परीक्षा देत असून या ठिकाणीही बैठे पथकात अरसले, वाघमारे, लटपटे, बनसोडे व भैरट यांची नियुक्ती केलेली आहे. तसेच तालुक्यातील केदारेश्वर विद्या मंदिर उखळी या केंद्रात केंद्र प्रमुख आदोडे एस.व्हि. यांच्या मार्गदर्शनात 12 हॉल मधून 286 विद्यार्थी व विद्यार्थिनी मिळून दहावीची परीक्षा देत आहे या ठिकाणीही पाच व्यक्तींची बैठे पथक नियुक्ती केलेले आहे तसेच तालुक्यातील चोथे केंद्र माधवाश्रम विद्यामंदिर खडका येथे केंद्र प्रमुख बुरांडे आर.एम. यांच्या मार्गदर्शनात 12 हॉल मधून 287 विद्यार्थी व विद्यार्थिनी मिळून दहावीची परीक्षा देत आहेत या ठिकाणीही पाच व्यक्तींची बैठे पथकात नियुक्ती केल्याची माहिती मा.शौकत पठाण (गट शिक्षण अधिकारी) यांनी दिली तसेच फिरते पथकातून मा.सचिन खुडे (गट विकास अधिकारी) व मा.शौकत पठाण (गट शिक्षण आधिकारी) या दोघांनी चारही केंद्रावर भेट देत फिरत असताना दिसत असून.अशा पद्धतीने सोनपेठ तालुक्यातून एकूण 4 केंद्रावर 44 हॉल मध्ये एकूण 1036 विद्यार्थी व विद्यार्थिनी मिळुन दहावीची परीक्षा शांततेत व कॉपीमुक्त वातावरणात देत असताना सुरुवात झालेली दिसत आहे.सोनपेठ तालुक्यातील चारहि केंद्रावर दहावीची परीक्षा शांततेत व कॉपीमुक्त सुरुवात झाल्याची साप्ताहिक सोनपेठ दर्शन प्रतिनिधीनी स्वतः शहरातील केंद्र श्री महालिंगेश्वर विद्यालय व जिल्हा परिषद प्रशाला या दोन्ही केंद्रास भेट देऊन पाहणी केली.








No comments:
Post a Comment