जिल्हा परीषद प्राथमिक शाळा डिघोळ ची हुमेरा बागवान हिचा ग्रामीण भागात कोरोना विषयी निस्वार्थ असा ही प्रचार प्रसार
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ तालुक्यात मौजे डिघोळ येथे दि 27 मार्च 2020 शुक्रवार रोजी प्राचार्य दत्ता नरहारे हे भाजी पाला विकत घेण्यासाठी गेले असता डिघोळ या आपल्या गावी नेहमी प्रमाणे ग्रामपंचायती समोर माळव विकणारे गावातील अनेक शेतकरी येतात, याप्रमाणे हुमेरा जिलानी बागवान जिल्हा परीषद प्राथमिक शाळा डिघोळ येथे इयत्ता 6 वी शिक्षण घेनारी ही सुद्धा माळव विकत बसली होती, प्राचार्य दत्ता नरहारे सरांनी सर्व ईतर भाज्या घेतल्या व शेवटी मेथिची भाजी घेणासाठी हुमेरा कडे गेले,नेहमीच्या ओळखी मुळे सरांनी तिची थट्टा केली आणि म्हणाले पैसे नाहीत उधार दे तिने होकारही दिला व 10 रुपायाच्या 2 जुड्या असा मेथीचा भाव सांगितला मी जुड्या घेतल्या व 10 रुपयांची नोट तिला दिली व निघालो असता तिने मला थांबवलं व तिच्या चिठ्ह्यांच्या गठयातून एक चिठ्ठी काढली व मला दिली आणि वाचा म्हणाली. "कोरोना संक्रमणा पासून बचावाचा" एक सुंदर अक्षरात तिने लिहिलेला संदेश पाहून व तिची आगळी वेगळी संकल्पना पाहून खूप आश्चर्य वाटले, तिने सांगितले की अशा चिठया बनवून ती येणाऱ्या प्रत्यक ग्राहकाला देत आहे, पण दुःख याचे वाटले गावातील ढोंगी volunteer झुंड च्या झुंड घेऊन कोरोनाची जागृती करत असल्याचं दाखवत आहेत, परंतु ही छोटीशी मुलगी निस्वार्थपणे, निष्पाप मनाने कोरोनाची जनजागृती एका जागेवर बसून आपले काम करत प्रचार प्रसार करत होती, याप्रसंगी संत सावता माळी यांची आठवण या मुलींनी करून दिली, खूप चांगल्या पिढीच्या सहवासात असल्याचा सुखद आनंद या मुलीने दिला.अशी आप बिती सांगितली.
No comments:
Post a Comment