Friday, March 20, 2020

परभणी जिल्ह्यासह सोनपेठ तालुक्यातील तमाम जनतेनी रविवारी होणाऱ्या "जनता कर्फ्युमध्ये" सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत सहभागी व्हावे

परभणी जिल्ह्यासह सोनपेठ तालुक्यातील तमाम जनतेनी रविवारी होणाऱ्या "जनता कर्फ्युमध्ये" सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत सहभागी व्हावे




सोनपेठ (दर्शन) :- रविवार दि.22 मार्च रोजी जनता कर्फ्यू मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत कोरोनाला हरवण्यासाठी आपण सर्वांनी यामध्ये सहभागी व्हायला हवे असे आवाहन श्री अन्नपूर्णा चँरीटेबल ट्रस्ट परळी , रोटरी क्लब सोनपेठ , श्री नंदिकेश्वर मठ संस्थान व सा.सोनपेठ दर्शन परीवार यांनी केले आहे.

जगभरात कोरोनाचे सुरु असलेले थैमान, देशात दिवसेंदिवस वाढत असलेली रुग्णसंख्या या पार्शवभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवाशीयांशी संवाद साधला. येत्या रविवारी दिवसभर देशभरात जनता कर्फ्यू करण्यात यावा असं आवाहन पंतप्रधांनांनी केले आहे. 22 मार्च रोजी सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत हा कर्फ्यू पाळावा असे देशाचे पंतप्रधान म्हणाले आहेत. कोरोनाशी लढण्यासाठी आपण किती तयार आहोत याची तपासणी याद्वारे आपण करणार आहोत अशी साद आपल्या पंतप्रधानांनी आपल्याशी घातली आहे. या दिवशी नागरिकांनी घराबाहेर पडू नये, आपल्या देशाच्या हितासाठी आपण घरातच राहावे अशी विनंती आपल्या पंतप्रधानांनी आपल्याशी केलेली असून आपण या विनंतीला व आवाहनाला प्रतिसाद देत या जनता कर्फ्युमध्ये सहभागी व्हावे असे श्री अन्नपूर्णा चँरीटेबल ट्रस्ट परळी , रोटरी क्लब सोनपेठ , श्री नंदिकेश्वर मठ संस्थान व सा.सोनपेठ दर्शन परीवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हंटले आहे.

No comments:

Post a Comment