३१ मार्च २०२० रोजी भारतीय स्टेट बँकेच्या सर्व शाखा रात्री 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येतील
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
वित्तीय वर्ष २०१९ - २०२० अखेरच्या दिवशी दि . ३१ मार्च २०२० रोजी सन २०१९ - २०२० चे प्राप्त अनुदान खर्ची पाडणे व आर्थीक व्यवहार पूर्ण करण्यासाठी परभणी जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी जिल्हा कोषागार कार्यालय , परभणी व तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी सर्व उपकोषागार कार्यालये रात्री ११ वाजेपर्यंत तसेच भारतीय स्टेट बँक ( स्टेडीयम शाखा ) परभणी तालुका स्तरावरील भारतीय स्टेट बँक सर्व शाखा रात्री ११ वाजेपर्यंत कार्यरत ठेवणे आवश्यक आहे . याबाबत जिल्हा कोषागार अधिकारी , परभणी यांनी विनंती केल्यामुळे महाराष्ट्र कोषागार नियम १९६८ च्या तरतुदीनूसार नियम क्रं . ४०९ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार जिल्हाधिकारी दी . म . मुगळीकर यांनी दि . ३१ मार्च २०२० रोजी भारतीय स्टेट बैंक ( स्टेडीयम शाखा ) परभणी तसेच शासकिय व्यवहार करणा - या तालुका स्तरावरील सेलु / गंगाखेड / पाथरी पुर्णा / जिंतूर / पालम / सोनपेठ / मानवत येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखा रात्री ११ वाजेपर्यंत सन २०१९ - २०२० या आर्थीक वर्षाचे सर्व शासकिय व्यवहार पुर्ण करण्यास्तव चालू ठेवणेबाबत आदेशीत केले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment