सोनपेठ (दर्शन) :-
जगभर कोरोना या महामारीचे स्वरूप घेत असून त्याला प्रतिबंध करण्यासाठी ते रोखण्यासाठी प्रशासन मोठ्या उपाययोजना करत असतांनाही नागरिक मात्र कोरोनाच्या जीवघेण्या संकटाला गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
जीवघेणा संसर्गजन्य असलेल्या कोरोनाच्या उपद्रवाने आता महामारीचे स्वरूप घ्यायला सुरुवात केली आहे.
महाराष्ट्र राज्य या महामारीच्या दुसऱ्या टप्प्यात आले असून राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या आता पन्नाशी पार करत आहे. राज्यात याने महाभयंकर स्वरूप धारण करू नये यासाठी राज्यशासन आटोकाट प्रयत्न करत आहे.
शासन सर्वच पातळीवर दक्ष राहून या जीवघेण्या रोगाची शृंखला तोडण्याची जोरदार तयारी करत आहे. परंतु नागरिक मात्र या प्रयत्नांना हरताळ फासत असल्याचे दिसून येत आहे.
कोरोना हा रोग एकमेकांच्या संपर्कातून फैलावला जात आहे. त्यामुळे नागरिकांचा संपर्क टाळण्यासाठी नागरीकांनी एकत्र न येण्याबाबत सरकार वारंवार सूचना करत आहे.
त्यासाठी राज्यात १४४ कायदा लागू करून सरकारने कुठल्याही ठिकाणी पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास प्रतिबंध केला आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षितता म्हणून अशा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत आहे. परंतु स्थानिक नागरिक मात्र या कुठल्याही विषयाला गांभीर्याने घेत नसल्याचे स्पष्ट होत आहे.
दि २१ रोजी जिल्हाधिकारी परभणी यांच्या आदेशानुसार सोनपेठ शहरातील संपुर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. यातुन जीवनावश्यक वस्तुची दुकाने भाजीपाला, दुध, किराणा यांची दुकाने वगळण्यात आली होती .नागरीकांचा संपर्क तोडुन कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असतांना आज बंद च्या दिवशी भाजीपाल्याच्या दुकांनांना सुट असल्याने शहरात फिरुन अथवा लांब अंतराने बसुन गर्दी न जमवता भाजी पाला विकण्याचे न प मुख्याधिकारी यांनी तोंडी आदेशित करुनही याकडे भाजीपाला, फळ विक्रत्यांनी दुर्लक्ष करुन डाँ बाबासाहेब आंबेडकर चौकात आपली दुकाने थाटली .त्यात नागरीकांनी आठवडी बाजाराप्रमाने गर्दी केली होती .भाजीपाल्याची दुकाने रोजच उघडी ठेवण्यात येणार असतांना उगाचच नागरीक गर्दी करत आहेत.नागरीकांच्या भितीचा फायदा घेत भाजी विक्रेत्यांनी भाजीचा दर चौपट करुन ग्राहकांची चांगलीच लुट केली .कलम १४४ लागु करण्यात आल्यावर त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असलेले सोनपेठ पोलीस कोरोना बाबत दक्ष नसल्याचे दिसुन येते बाजारात अनावश्यक गर्दी करणाऱ्या सोबत कुठलीही सक्ती करत नसल्याचे यावरुन दिसुन येते.
कोरोना या रोगासोबत लढण्यासाठी नागरीकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे होणे गरजेचे असतांना नागरिक बेजबाबदारपणे वागून या रोगाला आमंत्रीतच करत असल्याचे चिञ दिसून येत आहे.तर प्रशासन ही या बाबत फारसे दक्ष नसल्याचे पाहावयास मिळते.
No comments:
Post a Comment