Tuesday, March 31, 2020

खातेदारांनी बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राचा वापर करावा -जिल्हाधिकारी

खातेदारांनी बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राचा वापर करावा -जिल्हाधिकारी


परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

कोरोना विषाणू (कोविड - १९) च्या संसर्गाला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून खातेदारांनी बँकेत गर्दी न करता राष्ट्रीयकृत बँकेने व ग्रामीण बँकांनी उपलब्ध करून दिलेल्या ग्राहक सेवा केंद्राचा ( CSP ) वापर करावा. असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी केले आहे.

          जिल्ह्यामध्ये आज रोजी परभणी जिल्ह्यात राष्ट्रीयकृत  ग्रामीण बँकेचे विविध ठिकाणी एकूण ३३७ ग्राहक सेवा केंद्र कार्यरत असून या केंद्रामार्फत १० हजार रुपयापर्यंत पैसे काढणे, २० हजार रुपयापर्यंत पैसे भरणे व २० हजार रुपयापर्यंतची रक्कम इतरांच्या खात्यामध्ये भरणे या सेवा पुरविण्यात येतात.
          त्याचप्रमाणे जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रामार्फत २० हजार रुपयापर्यंत पैसे काढणे, २० हजार रुपये पर्यंत पैसे भरणे व ५० हजार रुपयापर्यंत इतरांच्या खात्यामध्ये पैसे भरण्याची सेवा पुरविण्यात येत आहे. तरी बँकेमार्फत गाव  व दिवस निहाय ग्राहक सेवा केंद्राचे वेळ बँकाकडून घोषित करण्यात येईल. तसेच ग्राहक सेवा केंद्रावरील ( SCP )  सेवेसाठी शुल्क आकारले जाणार नसून ग्राहकांनी या सेवा केंद्राचा वापर केल्यावर त्यांना बँकेच्या शाखेपर्यंत प्रवास करावा लागणार नाही यामुळे काम सोपे होण्यास मदत होणार आहे . तरी या सेवेचा सर्व खातेदारांनी लाभ घ्यावा. असे जिल्हाधिकारी , परभणी यांनी कळविले आहे .
                    -*-*-*-*-

मुंबई, पुण्यावरुन आलेल्या नागरिकांना आवाहन कोरोनाची लक्षणे आढळल्यास तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयाशी संपर्क साधा

मुंबई, पुण्यावरुन आलेल्या नागरिकांना आवाहन कोरोनाची लक्षणे आढळल्यास तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयाशी संपर्क साधा


औरंगाबाद / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
 
मुंबई व पुणे येथून जे नागरिक मराठवाडा विभागातील आठही जिल्ह्यात आले असतील आणि त्यांना कोरोना आजाराचे थोडेही लक्षणे जाणवत असतील तर त्यांनी तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयाशी संपर्क साधून तपासणी करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त कार्यालय प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या सुरू असलेल्या संचारबंदीच्या काळात जनतेला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून शासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. संचारबंदीपूर्वी मुंबई, व पुण्यावरून अनेक नागरिक आपापल्या गावाकडे मोठ्या संख्येने आले. अशा नागरिकांना कोरोनाची थोडीही लक्षणे जाणवत असतील तर त्यांनी तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयाशी संपर्क साधून तपासणी करून घ्यावी. संपर्कासाठी विभागातील आठही जिल्हयातील जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक यांचे मोबाईल  व त्यांचे दुरध्वनी क्रमांक पुढील प्रमाणे आहे. औरंगाबाद -डॉ. सुंदर कुलकर्णी 7020843292, 9823070351, जालना- डॉ. मधुकर राठोड, 9422215730, 02482-224381, बीड- डॉ. अशोक थोरात, 9527239000, परभणी-डॉ. बाळासाहेब नागरगोजे 9422744850, (02452) 223458, 
लातूर-डॉ. संजय ढगे 9822823773, 02382/246803, हिंगोली- डॉ. किशोर श्रीवास 91300 53862, उस्मानाबाद -डॉ. गलांडे 9423718261, 02472/222475
02472/222100, नांदेड- डॉ. भोसीकर  9890130465, 02462234750, असे आवाहन विभागीय आयुक्त कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

सोनपेठ पंचायत समिती सभापती, उपसभापती व प.स.व जि.प.सर्व सदस्यांचे एक महीन्याचे मानधन ग्रामिण रुग्नालयास कोरोनाग्रस्त निवारणार्थ साधन - सामग्रीसाठि 28,800 रुपयांचा धनादेश सुपुर्थ

सोनपेठ पंचायत समिती सभापती, उपसभापती व प.स.व जि.प.सर्व सदस्यांचे एक महीन्याचे मानधन ग्रामिण रुग्नालयास कोरोनाग्रस्त निवारणार्थ साधन - सामग्रीसाठि 28,800 रुपयांचा धनादेश सुपुर्थ
 
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ पंचायत समिती सभापती सौ.मिराबाई बाबुराव जाधव, उपसभापती शंकर बचाटे, सदस्य राजाभाऊ कांदे, रंगनाथ प्रधाने व सदस्या आशाताई बदाले आदिसह जिल्हा परीषद सदस्यांनी आपले एक महीन्यांचे मानधन भारत देशावर तसेच महाराष्ट्र राज्यावर कोरोना या विषाणू मुळे मोठे संकट निर्माण झाले असुन त्यासाठी केंद्र सरकार तसेच राज्य सरकार ही शर्थीचे प्रयत्न करत आहे.या संकटाचा मुकाबला करण्यासाठी लोकप्रतिनीधी या नात्याने आपलीही सामाजीक व नैतिक जबाबदारी ओळखुन कोरोनाग्रस्त निवारणार्थ सभापती- 10,000/-, उपसभापती 8,000/-, प.स.सदस्यांनी प्रतेकी 1,200/- तर जि.प.सदस्यांनी प्रतेकी 3,000/- असे सर्व मिळुन 28,800/- रुपयांचा धनाधेश तालुका आरोग्य अधिकारी डाँ.सुभाष पवार यांच्या कडे सपुर्थ करण्यात आला.या निधीतुन ग्रामिण रुग्नालय येथिल कोरोनाग्रस्त निवारणार्थ लागणाऱ्या साधन - सामग्री खरेदी करण्यासाठी करावा असे निवेदन याप्रसंगी देण्यात आले.तसेच निवेदनाच्या प्रती मा.तहसीलदार व मा.गट विकास अधिकारी यांनाही माहीतीस्तव दिले असल्याची माहीती सभापती प्रतिनिधी भगवान राठोड यांनी सा.सोनपेठ दर्शन प्रतिनिधी जवळ दिली.

जिल्ह्यातील सर्व मद्य विक्रीच्या अनुज्ञप्त्या बंद

जिल्ह्यातील सर्व मद्य विक्रीच्या अनुज्ञप्त्या बंद


परभणी / सोनपेठ (दर्शन) :-   

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजनेचा भाग म्हणून जिल्ह्यात  दि.1 ते 14 एप्रिल 2020 या कालावधीत मुंबई मद्य निषेध कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन परभणी जिल्ह्यातील सर्व मद्य विक्रीच्या अनुज्ञप्त्या सीएल-3 देशी दारु किरकोळ विक्री अनुज्ञप्ती, एफएल-2, एफएल-3, एफएल-4, सीएल,एफएल,टिओडी-3, देशी व विदेशी दारु किरकोळ विक्री अनुज्ञप्ती. एफएल-3 परवाना कक्ष व एफएल,बीआर-2, बिअरची सिल बंद बाटलीतून विक्री बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्ती धारका विरुध्द कडक कारवाई करण्यात येईल. असेही आदेशात नमुद केले आहे.
-*-*-*-*-

Monday, March 30, 2020

जिल्हाधिकारी दि. म. मुगळीकर यांचे आवाहन; जिल्ह्यातील वैद्यकीय सेवा 24 तास सुरू ठेवावी


परभणी / सोनपेठ (दर्शन) :-  

जिल्ह्यातील इंडियन मेडिकल असोशियशन , आयुर्वेदिक व्यासपीठ असोशियसन , निमा असोशियशन , अध्यक्ष होमिओपॅथी असोशियशन आणि जिल्हयातील इतर वैद्यकीय सेवा देणा-या संघटनांनी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या रुग्णांसाठी देण्यात येणाऱ्या सर्व वैद्यकीय सेवा 24 तास अखंडितपणे सुरू ठेवाव्यात. असे आवाहन जिल्हाधिकारी दि.म. मुगळीकर यांनी केले आहे.
          राज्यात जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे परभणी जिल्ह्यात वैद्यकीय सेवा खंडित करण्यात येवून शहरी व ग्रामीण भागातील दवाखाने बंद असल्यामुळे आरोग्य सेवेसाठी जिल्ह्यातील नागरिकांची गर्दी एकवटत असल्याचे निदर्शनास येत आहे .
     तरी कोरोना विषाणू संसर्गच्या या आपात्कालीन परिस्थितीत जिल्ह्यातील वैद्यकीय सेवा खंडित करण्यात येऊ नयेत तसेच आपण आपल्या ओपीडी आणि इतर सर्व वैद्यकीय सेवा सर्व प्रकारच्या रुग्णांसाठी २४ तास नियमितपणे सुरु ठेवण्यात याव्यात. जेणेकरून दि. १४ एप्रिल २०२० पर्यंतच्या लॉकडाऊनमध्ये आरोग्य सेवेसाठी नागरिकांची एका ठिकाणी गर्दी होणार नाही आणि कोरोना विषाणूचा संसर्ग कमी करण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊनमध्ये सहभागी होवून या आपत्तीचा सक्षमपणे सामना करता येईल. असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी, परभणी यांनी कळविले आहे.
                             -*-*-*-*-
जिल्हाधिकारी दि. म. मुगळीकर यांचे आवाहन; जिल्ह्यातील वैद्यकीय सेवा 24 तास सुरू ठेवावी


परभणी / सोनपेठ (दर्शन) :-  

जिल्ह्यातील इंडियन मेडिकल असोशियशन , आयुर्वेदिक व्यासपीठ असोशियसन , निमा असोशियशन , अध्यक्ष होमिओपॅथी असोशियशन आणि जिल्हयातील इतर वैद्यकीय सेवा देणा-या संघटनांनी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या रुग्णांसाठी देण्यात येणाऱ्या सर्व वैद्यकीय सेवा 24 तास अखंडितपणे सुरू ठेवाव्यात. असे आवाहन जिल्हाधिकारी दि.म. मुगळीकर यांनी केले आहे.
          राज्यात जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे परभणी जिल्ह्यात वैद्यकीय सेवा खंडित करण्यात येवून शहरी व ग्रामीण भागातील दवाखाने बंद असल्यामुळे आरोग्य सेवेसाठी जिल्ह्यातील नागरिकांची गर्दी एकवटत असल्याचे निदर्शनास येत आहे .
     तरी कोरोना विषाणू संसर्गच्या या आपात्कालीन परिस्थितीत जिल्ह्यातील वैद्यकीय सेवा खंडित करण्यात येऊ नयेत तसेच आपण आपल्या ओपीडी आणि इतर सर्व वैद्यकीय सेवा सर्व प्रकारच्या रुग्णांसाठी २४ तास नियमितपणे सुरु ठेवण्यात याव्यात. जेणेकरून दि. १४ एप्रिल २०२० पर्यंतच्या लॉकडाऊनमध्ये आरोग्य सेवेसाठी नागरिकांची एका ठिकाणी गर्दी होणार नाही आणि कोरोना विषाणूचा संसर्ग कमी करण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊनमध्ये सहभागी होवून या आपत्तीचा सक्षमपणे सामना करता येईल. असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी, परभणी यांनी कळविले आहे.
                             -*-*-*-*-

गरीब व मजूर व्यक्तींनी 'शिवभोजन' योजनेचा लाभ घ्यावा - जिल्हाधिकारी

गरीब व मजूर व्यक्तींनी 'शिवभोजन' योजनेचा लाभ घ्यावा - जिल्हाधिकारी


परभणी / सोनपेठ (दर्शन) :-  

जिल्ह्यात शिधापत्रिका नसलेल्या व्यक्तींना मोफत व स्वस्त धान्य वितरीतकरण्याबाबत कोणत्याही स्वरूपाच्या सुचना शासनाकडून देण्यात आलेल्या नाहीत. परंतु कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने गरीब, मजुर तसेच गरजू कुटुंबांना 'शिव भोजन' योजनेच्या संकल्पनेतून माफक दरामध्ये जेवणाची व्यवस्था जिल्हा व तालुकास्तरावर करण्यात आली आहे. तरी गरीब व गरजू व्यक्तींनी 'शिवभोजन' या योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी केले आहे. 
         कोरोना विषाणूचा प्रसार होवू नये याबाबत दक्षता म्हणून शासनाच्या निर्देशानूसार पात्र शिधापत्रीका धारकांना माहे एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्याचे धान्य वितरीत करण्याची कार्यवाही जिल्हास्तरावरून करण्यात येत आहे. 
        शिधापत्रिका नसलेल्या व्यक्तींना मोफत व स्वस्त धान्य वितरीतकरण्याबाबत सुचना शासनाकडून देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे शिधापत्रिका नसलेल्या व्यक्तींची कोणत्याही स्वरूपाची माहिती जिल्हाधिकारी अथवा तहसिल कार्यालयामार्फत संकलीत करण्यात येणार नाही. तरी शिधापत्रिका नसलेल्या व्यक्तींना मोफत स्वस्त धान्य वितरीत करण्यासाठी माहिती संकलीत करण्यात येत असल्याचा व्हाट्सअप व सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारीत होणारा संदेश व नमुना खोटा आहे. असेही स्पष्टीकरण जिल्हा प्रशासनाकडून  देण्यात आले आहे.
-*-*-*-*- 

Sunday, March 29, 2020

हातावरचे पोट असणाऱ्या गोरगरिबांसाठी शालीमार समूहाने पुढे केला मदतीचा हात

हातावरचे पोट असणाऱ्या गोरगरिबांसाठी शालीमार समूहाने पुढे केला मदतीचा हात 
    

      
परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

करोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉक डाऊन झाले आहे. या परिस्थितीमध्ये अनेक गरिबांचे घरी आज कामाला गेले तरच उद्या चूल पेटते अशी विदारक परिस्थिती असल्याचे भान ठेवत शालिमार समूहाचे संस्थापक  हमीद खान यांनी जीवनावश्यक वस्तूंचे एक कीट तयार केला आहे . जीवनावश्यक वस्तूंचे 3500व्यक्तींना म्हणजेच सातशे कुटुंबांना 15 दिवस पुरेल एवढे जीवनावश्‍यक वस्तूंचे आज जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या सोबत शालिमार ग्रुपचे संस्थापक शेख हमीद यांनी गरीब लोकांना राशन आणि घरगुती साहित्याचे वितरण केले. यामधये  पाच किलो तांदूळ, साडेसात किलो गहू, तेल एक किलो , दोन किलो दाळ, साखर दीड किलो, चहापत्ती 250 ग्रॅम, हळदी 100 ग्रॅम, मिरची पावडर 250 ग्रॅम, मीठ एक किलो, कपडे धुण्यासाठी साबण एक नग, आंघोळीसाठी डेटॉल साबण 2 नग आणि सर्फ यावेळी गोरगरीब व गरजू लोकांनी जिल्हाधिकारी श्री मुगळीकर साहेब व शेख हमीद यांचे ऋण व्यक्त केले.

एकही गरजू व्यक्ती उपाशी राहणार नाही -जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांचे विविध सेवाभावी संस्थाना आवाहन

एकही गरजू व्यक्ती उपाशी राहणार नाही -जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांचे विविध सेवाभावी संस्थाना आवाहन




परभणी / सोनपेठ (दर्शन) :-  कोरोनाच्या  परिस्थितीमुळे जिल्ह्यासह इतर राज्यातील एकही व्यक्ती, मजूर, हमाल, रोजंदारी  कर्मचारी उपाशी राहणार नाही याची काळजी घ्यावी.
कोरोनाच्या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकारी श्री. मुगळीकर यांनी जिल्ह्यातील विविध सेवाभावी संस्थांची आढावा बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक , निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे,  उपजिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, डॉ. संजय कुंडेटकर , महापालिका सहाय्यक आयुक्त अल्केश देशमुख सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे, तहसीलदार विद्याचरण कडवकर आणि विविध सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या परिस्थितीमध्ये परराज्यातील कामगार व जिल्ह्यातील एकही व्यक्ती उपाशी राहणार नाही, यासाठी विविध सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेऊन सर्व गरजूंना जीवनावश्यक वस्तू व अन्न उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हाधिकारी श्री. मुगळीकर यांनी आवाहन केले. तसेच विविध सेवाभावी संस्थेकडून व नागरिकांकडून मदत स्वीकारणे व वितरण करणे व त्यांच्यात समन्वय साधणे इत्यादींसाठी जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली आहे या कक्षाचे प्रमुख व सेवाभावी संस्थांचे प्रमुख यांचा ताळमेळ घालून देण्यात आला जेणेकरून गरजुन पर्यंत जीवनावश्यक वस्तंचे वितरण व्यवस्थित व्हावे..
000000
 

घरमालकांनी एका महिन्याचे घरभाडे घेऊ नये - जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर

घरमालकांनी एका महिन्याचे घरभाडे घेऊ नये - जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर


परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 
जिल्ह्यामध्ये परराज्यातून तसेच इतर जिल्ह्यांमधून मजुरी, व्यवसाय, शिक्षण, व इतर कारणामुळे परभणी जिल्ह्यात घर भाड्याने घेऊन वास्तव्य करणाऱ्या नागरिकांचे घरमालकांनी एका महिन्याचे घरभाडे घेऊ नये.असे आवाहन जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष दी.म.मुगळीकर यांनी केले आहे.

        जिल्ह्यात परराज्यातून मजुरी, व्यवसाय, शिक्षण आणि इतर कारणांसाठी मोठ्या प्रमाणावर मजूर , व्यावसायिक , विद्यार्थी , नोकरदार वर्ग आदी जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी भाड्याने घर घेवून राहत आहेत. कोरोना विषाणू  संसर्गाच्या आपात्कालीन परिस्थितीत जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या घरी राहणा-या भाडेकरुना सद्यस्थितीत घराबाहेर काढू नये तसेच ज्या नागरिकांची उपजीविका मजुरी किंवा व्यवसायावर अवलंबून आहे अशा भाडेकरूंचे एक महिन्याचे भाडे सबंधित घरमालक यांनी घेवू नये. तसेच आपत्कालीन परिस्थितीत आपल्या भाडेकरुना आवश्यकता असल्यास अन्नधान्य आणि इतर बाबतीत मदत करावी. जेणेकरून दि. १४ एप्रिल २०२० पर्यंतच्या लॉकडाऊनमध्ये अशा नागरिकांचे स्थलांतर होणार नाही आणि कोरोना विषाणूचा संसर्ग कमी करण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊनमध्ये सहभागी होवून या आपत्तीचा सक्षमपणे सामना करता येईल. असेही जिल्हा प्रशासनाकडून कळविले आहे.
                     -*-*-*-*-

Saturday, March 28, 2020

वसा सामाजीक बांधीलकीचा ; आ.सुरेश वरपुडकर कुटंबियाचा

वसा सामाजीक बांधीलकीचा ; आ.सुरेश वरपुडकर कुटंबियाचा


सोनपेठ (दर्शन) :- 

परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती समशेर सुरेश वरपुङकर यांच्या तर्फे सोनपेठ शहरात गरजू लोकांना 500 मोफत अन्न पाकीटे वाटप करण्यात आले या वेळस डॉ.सुभाष पवार, डॉ.सिध्देश्वर हलगे ,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा.डॉ.मुंजाभाऊ धोंङगे, शुभम कदम शहर अध्यक्ष युवक काॅग्रेस व सोनपेठ तालुका शहर काँग्रेस कमिटी पदाधीकारी मोठ्या संखेणे उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना कक्षास भेट देऊन विलगीकरण कक्षातील नागरिकांशी साधला संवाद

जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना कक्षास भेट देऊन
 विलगीकरण कक्षातील नागरिकांशी साधला संवाद 


परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

परभणी येथे अग्नीशमन दलाच्या व्हॅनमार्फत जिल्हा रुग्णालयात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली असून  आपत्ती व्यवस्थापन प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी दी . म . मुगळीकर , उपजिल्हाधिकारी डॉ. संजय कुंडेटकर,  जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी कोरोना कक्षास भेट देवुन पाहणी केली व संपूर्ण आढावा घेवुन कक्षात विलगीकरण करण्यात आलेल्या नागरिकांशी संवाद साधला.
       कोरोना आपत्ती परिस्थिती पाहता व भविष्यकालीन उपाययोजनांच्या अनुषंगाने तसेच नागरिकांना दैनंदिन अत्यावश्यक सोयी, सुविधा व सेवा सुलभ रितीने मिळण्यासाठी परभणी शहरातील कल्याण मंडपम, धार रोडवरील डॉ . बाबासाहेब आंबेडकर मुलांचे व मुलींचे वसतीगृह  व  क्रीडा संकुला जवळील नवनिर्मित जिल्हा परिषद इमारतींची पाहणी जिल्हाधिकारी दी . म . मुगळीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली आपत्ती प्रशासन पथकामार्फत करण्यात आली. तसेच या जागी गरजु नागरिकांना भविष्यात विलगीकरण, अत्यावश्यक वस्तुंचे सेवा केंद्र कार्यान्वीत करण्यासाठी जिल्हाधिकारी श्री. मुगळीकर यांनी पाहणी करुन चाचपणी केली.
       आजपर्यंत जिल्हा रुग्णालय परभणी येथे १४१ रुग्णांची नोंद झालेली त्याची वर्गवारी पुढीलप्रमाणे आहे. एकुण घेण्यात आलेले स्वॅब ९२ व त्या पैकी ६६ निगेटिव्ह असुन ११ स्वॅब अहवाल प्रलंबित आहेत. आजतागायत एकुण १५ स्वॅब एन . आय . व्हि ( राष्ट्रीय विषाणु संस्था ) पुणे यांनी तपासणीची आवश्यकता नसल्याचा निर्वाळा दिलेला आहे . आज दि. २८ मार्च २०२० रोजी एकुण ७ रुग्णांचा नमुना ( स्वॅब ) तपासणीसाठी राष्ट्रीय विषाण संस्था पुणे ( एन . आय . व्हि ) येथे पाठविण्यात आला आहे.  एकुण नोंद झालेले संशयीत रुग्ण १४१  पैकी घरी विलगीकरण११४, हॉस्पीटलमध्ये संसर्गजन्य कक्षात १४, विलगीकरणाचा कालावधी पुर्ण झालेले १३, तसेच नोंद झालेल्या एकुण १४१ पैकी परदेशातुन आलेले ५७ व त्यांच्या सपंर्कातील ५ असे आहेत.  दि.28 मार्च रोजी नव्याने 7 संशयीत दाखल झाले आहे.
    जीवनावश्यक वस्तू , औषधी आणि अन्नधान्य, भाजीपाला यांची दुकाने पूर्णवेळ सुरु राहणार असुन नागरीकांनी नाहक गर्दी करु नये व अफवांना बळी पडु नये. तसेच काही अडचण असल्यास पोलीस नियंत्रण कक्ष परभणी क्रमांक ०२४५२ - २२६२४४ व्हॉटसअॅप क्रमांक - ७७४५८५२२२२ व आपत्ती प्रशासन कक्षातील दुरध्वनी कंमाक ०२४५२ - २२६४०० येथे संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. 
-*-*-*-*-

सोनपेठ दर्शन मदत

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊन परिस्थितीमुळे पत्रकारिता क्षेत्रात प्रचंड आर्थिक संकट निर्माण झाले आहे वृत्तपत्र कार्यालयातील कर्मचारी छपाई विभागातील कर्मचारी आणि टेबल वर्किंग वर काम करणाऱ्या पत्रकारांच्या अडचणींमध्ये वाढ निर्माण झाली आहे अनेक वृत्तपत्रे प्रकाशापासून अलिप्त होऊ लागले आहेत तर अनेक वृत्तपत्र आर्थिक संकटात सापडले आहे या राजकारण्यांना याच पत्रकारितेने आतापर्यंत सहकार्य केले त्या राजकारण्यांनी अशा संकटाच्या वेळी पत्रकारांसाठी धावून येणे खूप गरजेचे झाले आहे अनेक वृत्तपत्रांच्या जाहिरात बाक्या अजूनही मिळालेल्या नाहीत बंद अवस्थेत असलेल्या या वृत्तपत्रांच्या कार्यालयात कर्मचारी हताश होऊन पुढे काय करायचे या चिंतेत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसऱ्यांसाठी जीव तोडून काम करणाऱ्या पत्रकारांना शासनाकडून अद्याप तरी कुठलीही मदत जाहीर झालेली नाही. पत्रकारितेचे व्रत कसे पूर्ण करणार हाही प्रश्न सतावत लागला आहे पत्रकारांच्या आर्थिक विवंचनेत मुळे त्याचे अख्खे कुटुंब देखील अडचणीत सापडले आहे अशावेळी राजकारण्यांनी आपल्याकडे असलेल्या आर्थिक जाहीरात बील तात्काळ देऊन पत्रकारिता क्षेत्रात हे योगदान मोठे होईल शासनाने देखील प्रत्येक पत्रकारास पाच हजार रुपये आणि जीवनावश्यक वस्तू देऊन या संकटातून बाहेर येण्यासाठी धीर द्यावा एवढी माफक अपेक्षा केली जात आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्यांना जाहीर केलेल्या मदतीमध्ये राज्य सरकार कडून पत्रकारांसाठी अशी घोषणा केली तर अशा संकटसमयी यातून पत्रकारांना दिलासा मिळेल मोठमोठ्या वृत्तपत्रांमध्ये काम करत असणाऱ्या लोकांना उपासमारीची वेळ येणार नाही मात्र छोटे वृत्तपत्र आणि त्यांचे प्रतिनिधी यांच्यावर हे संकट कोसळणार आहे तेव्हा हा राजकारण्यांनी आणि सरकारनेही ही याबाबत गांभीर्याने विचार करावा अशी आशा वृत्तपत्र क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांकडून केली जात आहे शहरी भागातच पत्रकारिता आहे असे नाही तर ग्रामीण भागातही पत्रकारांची संख्या अधिक आहे त्याच्या कुटुंबीयांना सावरण्यासाठी मदतीची खूप गरज निर्माण झाली आहे

मुख्यमंत्री सहाय्यता निधी -कोविड-19 या नावाने स्वतंत्र बँक खाते ; या खात्यात मदत जमा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुख्यमंत्री सहाय्यता निधी -कोविड-19 या नावाने स्वतंत्र बँक खाते ; या खात्यात मदत जमा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन


मुंबई / परभणी / सोनपेठ (दर्शन) : -

कोविड विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन काटेकोर उपाययोजना करत असून या उपाययोजनांमध्ये अनेक स्वंयसेवी संस्था, उद्योजक, धार्मिक संस्था स्वंयप्रेरणेने सहभागी होत आहेत, मुख्यमंत्री  सहाय्यता निधीस मदत करत आहेत, करू इच्छित आहेत. केवळ याच प्रयोजनार्थ मुख्यमंत्री  सहाय्यता  निधी- कोविड-19 हे स्वतंत्र बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आले आहे. त्याचा बचत खाते क्रमांक 39239591720 आहे. 
*सढळ हाताने मदत करा*
उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वंयसेवी संस्था,धार्मिक संस्था राज्य शासनाच्या बरोबरीने या युद्धात सहभागी होऊन मदत करू इच्छितात त्या सर्व  संस्था आणि नागरिकांनी “मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड 19 या नावाने सुरु करण्यात आलेल्या खात्यात सढळ  हाताने मदतीची रक्कम जमा  करावी  असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

खात्याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. 

Chief Minister’s Relief Fund-COVID 19

Savings Bank Account number 39239591720

State Bank of India,

Mumbai Main Branch, 
Fort Mumbai 400023
Branch Code 00300
IFSC CODE- SBIN0000300


मराठीत-

मुख्यमंत्री  सहाय्यता निधी-कोविड 19
बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720
स्टेट बँक ऑफ इंडिया,
मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023
शाखा कोड 00300
आयएफएससी कोड SBIN0000300


सदर देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या 80 (G) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते. 

श्री जैन श्वेतांबर श्री पद्मप्रभु महाराज देवालय ट्रस्ट, पोयनाड तर्फे आरोग्य सुविधांसाठी दोन लाख पंचवीस हजार रुपयांचा धनादेश रायगड - अलिबाग जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द

श्री जैन श्वेतांबर श्री पद्मप्रभु महाराज देवालय ट्रस्ट, पोयनाड तर्फे आरोग्य सुविधांसाठी  
दोन लाख पंचवीस हजार रुपयांचा धनादेश रायगड - अलिबाग जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द


अलिबाग / रायगड / परभणी / सोनपेठ (दर्शन):-
 
श्री जैन श्वेतांबर श्री पद्मप्रभु महाराज देवालय ट्रस्ट, पोयनाड (र.नं.A17-कोलाबा) यांच्यातर्फे भगवान श्री महावीर स्वामी जन्म कल्याण निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयातील रायगड जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधीमध्ये “करोना संकटाच्या आरोग्य सुविधांसाठी” रु. दोन लाख पंचवीस हजार रुपयांचा धनादेश जिल्हा0धिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
यावेळी या ट्रस्टचे मॅनेजिंग ट्रस्टी- श्री.प्रकाश जैन, माजी मॅनेजिंग ट्रस्टी- श्री.प्रकाश मुलचंद जैन, ट्रस्टी- विक्रम सोहनराज जैन,ट्रस्टी-अजित भिकमचंद जैन हे उपस्थित होते. 
राष्ट्रीय आपत्तीच्या या परिस्थितीत श्री जैन श्वेतांबर श्री पद्मप्रभु महाराज देवालय ट्रस्ट, पोयनाड या ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी दाखविलेल्या या दानशूरपणाचे जिल्हानधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी विशेष कौतुक केले आणि समाजातील इतर दानशूर व्यक्तींनी, सस्थांनी अशा प्रकारे मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हांधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी केले आहे.  
तसेच आतापर्यंत ज्या कंपन्यांनी, समाजसेवी संस्थांनी राष्ट्रीय कर्तव्य भावनेतून या करोना विषाणूच्या संकट काळात वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, मदतनीस यांना मास्क्, सॅनिटायजर, ऑक्सिजन सिंलिंडर्स दान केले आहेत वा विनामूल्य पुरविले आहेत, ज्या स्वयंसेवी संस्थांनी बाहेरील राज्यातील मजूरांना व अनाश्रित लोकांना अन्न पुरविले आहे व पुरवित आहेत, त्यांचेही जिल्हासधिकारी श्रीमती चौधरी यांनी मन:पूर्वक आभार व्यक्त केले आहेत. 
0000000

कोरोना लॉकडाऊन मुळे गस्ती वरील पोलीस मित्रांना रोटरी क्लब सोनपेठ च्या वतीने राजेश गायकवाड हे करतात चहा ची सोय तर ज्ञानेश्वर डमढरे यांनी दिले मास्क

कोरोना लॉकडाऊन मुळे गस्ती वरील पोलीस मित्रांना रोटरी क्लब सोनपेठ च्या वतीने राजेश गायकवाड हे करतात चहा ची सोय तर ज्ञानेश्वर डमढरे यांनी दिले मास्क





सोनपेठ (दर्शन) :-

जगात पछाडलेल्या कोरोना व्हायरस मुळे भारतात संपूर्ण लॉकडाऊन च्या धर्तीवर लॉक डाउन या धर्तीवर सोनपेठ पोलीस स्टेशन येथील गस्तीवर असलेल्या चाळीस-पन्नास अधिकारी व पोलिस जमादार, पोलीस शिपाई, महिला पोलीस आधी पोलीस मित्रांना सोनपेठ रोटरी क्लबच्या वतीने राजेश गायकवाड (मोबाईल हॉटेल चालक) यांच्या माध्यमातून केली चहाची सोय तर ज्ञानेश्वर डमढरे (कापड दुकानदार) यांनी कर्मचारी वर्गांना दिले मास्क. पोलिस मित्रांना सर्व जनतेने समजून घेण्याची आज गरज आहे. नागरिकांना या लॉकडाऊन मधून सूट अत्यावश्यक सेवा किराणा ,भाजीपाला इत्यादी बाजारपेठ वेळ सकाळी सात ते आठ असताना बाजार बंद करण्यासाठी व्यापारी लोकांना हीच पोलीस सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देताना साप्ताहिक सोनपेठ दर्शन प्रतिनिधी यांनी पाहिली आहे तसेच त्यांच्या भाषेतील आपलेपणा जाणवला परंतु हेच पोलिस मित्र गस्तीसाठि आपल्या घरासमोरून जात असताना देखील आपण एक देशाचे जबाबदार नागरिक म्हणून पिण्याच्या पाण्यासाठीही पोलीस मित्रांना विचारणा करत नाही हे बाब ओळखून सोनपेठ रोटरी क्लब यांनी चहाची सोय केली तसेच सामाजिक भावना समजून रस्त्यावरील पोट भरणाऱ्या राहुटि धारकांनाही पोलीस यंत्रणेच्या मार्फतच सोनपेठ रोटरी क्लब सर्व रोटरीयन यांनी तांदुळाचे वाटप हि केले असून पुन्हा स्वतःचा मोबाईल क्रमांकही देऊन आवश्यकता लागली तर पुन्हा सांगा असा शब्द दिला तसेच शहरातील दानशूर व्यक्ती व्यापारी असो की नोकरदार सर्व मिळून रोटेरियन आपल्या नावाचा गाजावाजा न करता आपली सामाजिक बांधिलकी म्हणून तसेच आपण ही समाजाचे देणे लागतो ही भावना मनी धरून मा.तहसीलदार मार्फत या कोरोना महामारीस  रोखण्यासाठी मदत निधी माननीय मुख्यमंत्री सहायता निधीस देण्याचा माणस याप्रसंगी रोटेरियन बांधवांनी साप्ताहिक सोनपेठ दर्शन प्रतिनिधी जवळ बोलून दाखवला यावेळी रोटरीयन बांधव व अनेक पोलिस अधिकारी, जमादार, शिपाई आदिजन उपस्थित होते.

३१ मार्च २०२० रोजी भारतीय स्टेट बँकेच्या सर्व शाखा रात्री 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येतील

३१ मार्च २०२० रोजी भारतीय स्टेट बँकेच्या सर्व शाखा रात्री 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येतील 



परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

वित्तीय वर्ष २०१९ - २०२० अखेरच्या दिवशी दि . ३१ मार्च २०२० रोजी सन २०१९ - २०२० चे प्राप्त अनुदान खर्ची पाडणे व आर्थीक व्यवहार पूर्ण करण्यासाठी परभणी जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी जिल्हा कोषागार कार्यालय , परभणी व तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी सर्व उपकोषागार कार्यालये रात्री ११ वाजेपर्यंत तसेच भारतीय स्टेट बँक ( स्टेडीयम शाखा ) परभणी तालुका स्तरावरील भारतीय स्टेट बँक सर्व शाखा रात्री ११ वाजेपर्यंत कार्यरत ठेवणे आवश्यक आहे . याबाबत जिल्हा कोषागार अधिकारी , परभणी यांनी विनंती केल्यामुळे महाराष्ट्र कोषागार नियम १९६८ च्या तरतुदीनूसार नियम क्रं . ४०९ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार जिल्हाधिकारी दी . म . मुगळीकर  यांनी दि . ३१ मार्च २०२० रोजी भारतीय स्टेट बैंक ( स्टेडीयम शाखा ) परभणी तसेच शासकिय व्यवहार करणा - या तालुका स्तरावरील सेलु / गंगाखेड / पाथरी पुर्णा / जिंतूर / पालम / सोनपेठ / मानवत येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखा रात्री ११ वाजेपर्यंत सन २०१९ - २०२० या आर्थीक वर्षाचे सर्व शासकिय व्यवहार पुर्ण करण्यास्तव चालू ठेवणेबाबत आदेशीत केले आहे.
-*-*-*-*-

Friday, March 27, 2020

जिल्हा परीषद प्राथमिक शाळा डिघोळ ची हुमेरा बागवान हिचा ग्रामीण भागात कोरोना विषयी निस्वार्थ असा ही प्रचार प्रसार


जिल्हा परीषद प्राथमिक शाळा डिघोळ ची हुमेरा बागवान हिचा ग्रामीण भागात कोरोना विषयी निस्वार्थ असा ही प्रचार प्रसार




सोनपेठ (दर्शन) :-
 
सोनपेठ तालुक्यात मौजे डिघोळ येथे  दि 27 मार्च 2020 शुक्रवार रोजी प्राचार्य दत्ता नरहारे हे भाजी पाला विकत घेण्यासाठी गेले असता डिघोळ या आपल्या गावी नेहमी प्रमाणे ग्रामपंचायती समोर माळव विकणारे गावातील अनेक शेतकरी येतात, याप्रमाणे हुमेरा जिलानी बागवान जिल्हा परीषद प्राथमिक शाळा डिघोळ येथे इयत्ता 6 वी शिक्षण घेनारी ही सुद्धा माळव विकत बसली होती, प्राचार्य दत्ता नरहारे सरांनी सर्व ईतर भाज्या घेतल्या व शेवटी मेथिची भाजी घेणासाठी हुमेरा कडे गेले,नेहमीच्या ओळखी मुळे सरांनी तिची थट्टा केली आणि म्हणाले पैसे नाहीत उधार दे तिने होकारही दिला व 10 रुपायाच्या 2 जुड्या असा मेथीचा भाव सांगितला मी जुड्या घेतल्या व 10 रुपयांची नोट तिला दिली व निघालो असता तिने मला थांबवलं व तिच्या चिठ्ह्यांच्या गठयातून एक चिठ्ठी काढली व मला दिली आणि वाचा म्हणाली. "कोरोना संक्रमणा पासून बचावाचा" एक सुंदर अक्षरात तिने लिहिलेला संदेश पाहून व तिची आगळी वेगळी संकल्पना पाहून खूप आश्चर्य वाटले, तिने सांगितले की अशा चिठया बनवून ती येणाऱ्या प्रत्यक ग्राहकाला देत आहे, पण दुःख याचे वाटले गावातील ढोंगी volunteer झुंड च्या झुंड घेऊन कोरोनाची जागृती करत असल्याचं दाखवत आहेत, परंतु ही छोटीशी मुलगी निस्वार्थपणे, निष्पाप मनाने कोरोनाची जनजागृती एका जागेवर बसून आपले काम करत प्रचार प्रसार करत होती, याप्रसंगी संत सावता माळी यांची आठवण या मुलींनी करून दिली, खूप चांगल्या पिढीच्या सहवासात असल्याचा सुखद आनंद या मुलीने दिला.अशी आप बिती सांगितली.

जन सेवा मित्र मंडळाच्या वतीने 300 गरजवंत कुटुंब प्रमुखांना 5 किलो तांदळाचे वाटप ; जन सेवा मित्र मंडळाचे सर्व स्तरातून कौतुक

जन सेवा मित्र मंडळाच्या वतीने 300 गरजवंत कुटुंब प्रमुखांना 5 किलो तांदळाचे वाटप ; जन सेवा मित्र मंडळाचे सर्व स्तरातून कौतुक 




सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ शहरातील जन सेवा मित्र मंडळाच्या वतीने गरजवंत कुटुंबप्रमुखाची यादी काढून कोरोना या महामारी च्या धर्तीवर शासनाच्या या लॉकडाऊन परिस्थितीत मजूर वर्ग,कष्टकरी वर्ग ,कामगार वर्ग तसेच निराधार वर्ग अशा लोकांना मदतीची गरज ओळखून जेव्हा जन सेवा मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष साजेद कुरेशी हे पुढाकार घेऊन यादी काढून प्रत्येकी 5 किलो तांदूळ वाटपाचा माणस समजतात प्रथम तहसीलदार सोनपेठ मा. डॉ.आशिष कुमार बिरादार , सोनपेठ वकील संघाचे सदस्य अँड.कुलभुषन दिलीपराव मोकाशे तसेच डाँ.गणेशराव मुंडे आदिसह जन सेवा मित्र मंडळाचे पदाधीकारी यांच्या संयुक्त विद्यमाने तांदूळ जमा करुन त्याची पाच किलो पँकिंग करणे व  ती 300 गरजवंत कुंटुंबाला वितरणाची जबाबदारी ही जन सेवा मित्र मंडळाच्या सर्व पदाधीकारी यांनी मिळुन पारपाडली.तसेच याप्रसंगी जन सेवा मित्र मंडळ संस्थापक अध्यक्ष साजेद कुरेशी यांनी  आवाहन केले आहे की सोनपेठ शहरातील दानशुर व्यक्ती, सामाजीक संघटना, मंदिर ट्रस्ट, मस्जित ट्रस्ट तसेच तमाम मित्र मंडळ पदाधीकारी यांनी आपल्या वतिने आज फुल ना फुलाची पाकळी म्हणुन आपल्या आपल्या परीने मदत करण्याची हिच ति वेळ आहे.या कार्यासाठी जन सेवा मित्र मंडळाच्या प्रतेक सदस्य असो वा पदाधीकारी यांचे पंचक्रोशितील सर्व स्तरातुन कौतुक होताना दिसत आहे.

कोरोना महामारीसाठी शिक्षकही सरसावले; एक दिवसाचे वेतन देणार



कोरोना महामारीसाठी शिक्षकही सरसावले; एक दिवसाचे वेतन देणार



पुणे/ परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व त्यावर उपाययोजना प्रभावीपणे राबवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून राज्यातील प्राथमिक शिक्षक एक दिवसाचे वेतन देऊन या कामी हातभार लावणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी दिली आहे. राज्यात प्राथमिक शाळांमध्ये साधारण पावणेतीन लाख शिक्षक-कर्मचारी सेवेत असून हे सर्वजण एका दिवसाचे वेतन करोनावरील उपाययोजनांसाठी देणार आहेत.

प्राथमिक शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात यांनी केलेल्या आवाहनानुसार राज्यातील प्राथमिक शिक्षक एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देणार असल्याचे तांबारे यांनी सांगीतले . या मोठ्या संकटाचा सामना करण्यासाठी राज्यातील सर्व शिक्षकांनी सहकार्य करावे, असे आवाहन शिक्षक संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

राज्यातील सर्व खाजगी अनुदान प्राप्त प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे १ दिवसाचे वेतन हे मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये घ्यावे, यासाठी आज महासंघाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री व शिक्षण व वित्त सचिव यांना निवेदन ई-मेलद्वारे पाठविण्यात आले.

१०० बेडचे नवीन ग्रामीण रुग्णालय सोनपेठ येथे तत्काळ सुरु करावे - मा. आमदार सुरेश वरपूडकर

१०० बेडचे  नवीन ग्रामीण रुग्णालय सोनपेठ येथे तत्काळ सुरु करावे - मा. आमदार सुरेश वरपूडकर




सोनपेठ (दर्शन) :-

कोरोना या वायरसच्या आजारामुळे संपूर्ण जग हतबल झालेले आहे .तीच परिस्थिती महाराष्ट्रात आहे.राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.उद्धवजी ठाकरे व मा.ना.राजेश टोपे राज्याची सध्याची परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळत आहेत. त्याबद्दल मा.ना. उद्धवजी ठाकरे व मा.ना.राजेश टोपे यांचे सर्व प्रथम अभिनंदन केले .

पाथरी मतदार संघातील सोनपेठ तालुक्यात १०० बेडच्या नवीन ग्रामीण रुग्णालयाचे नुकतेच बांधकाम पुर्ण झाले आहे.तरी रुग्णालयाचे उदघाटन झालेले नाही .परिणामी या दवाखान्या साठी लागणारे डॉक्टर, नर्स , परिचर,  सफाई कर्मचारी , सेवक ई. तसेच कोणत्याही मशिनरी , फर्निचर , पलंग ई. सुविधा  अद्याप नाहीत , कोरोना या साथीच्या आजाराच्या धसक्याने  तालुक्यातील लोक  भयभित झालेले आहेत.तालुक्यातील लोकांच्या भविष्यातील अडचणीचा विचार करून ग्रामीण रुग्णालाय सोनपेठ येथे तत्काळ डॉक्टरांची संख्या वाढवून या ठिकाणी १०० बेड व इतर आवश्यक असणारी मशनरी व साहित्य त्वरित पाठवावे व ग्रामीण रुग्णालय सुरु करावे अशी विनंती परभणी जिल्हा कॉंग्रेस कामिटी चे अध्यक्ष मा. आमदार सुरेशराव वरपूडकर यांनी लेखी स्वरुपात पत्राद्वारे महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री मा. ना.राजेश टोपे यांना केले आहे व तसेच परभणी जिल्हाधिकारी मा.दीपक मुगळीकर यांना सुद्धा कळविले आहे .

 

राजेशदादा विटेकर यांची वाढदिवसाचे निमित्त साधुन ग्रामीण रुग्णालयास आगळी-वेगळी 71,000/- हजार रुपयांची मदत

राजेशदादा विटेकर यांची वाढदिवसाचे निमित्त साधुन ग्रामीण रुग्णालयास आगळी-वेगळी 71,000/- हजार रुपयांची मदत
 
सोनपेठ (दर्शन) :-  

सोनपेठ येथिल ग्रामीण रुग्नालय येथे दि.27 मार्च 2020 शुक्रवार रोजी मा.जि.प.अध्यक्ष तथा सभापती राजेशदादा विटेकर यांनी आपला वाढदिवस आगळा-वेगळा आदर्श निर्माण करत निमित्त साधून सोनपेठ येथील ग्रामीण रुग्णालयास 71,000 /-  हजार रुपयांची आर्थिक मदत म्हणून चेक दिला. याप्रसंगी जि.प.अध्यक्षा श्रीमती निर्मलाताई विटेकर यांच्या शुभहस्ते मा.तहसीलदार डॉ.आशिषकुमार बिरादार यांच्या कडे 71,000 /- रुपयाचा चेक सपूर्द करण्यात आला यावेळी मा.जि.प.अध्यक्ष तथा सभापती राजेशदादा विटेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुभाष पवार, डॉ.सिध्देश्वर हालगे आदिंची उपस्थिती होती.

Thursday, March 26, 2020

मुख्यमंत्री साहयता निधी याच खात्यात जमा करावी.निधी स्वरूपात मदत जमा करण्यासाठी



मुख्यमंत्री साहयता निधी याच खात्यात जमा करावी.निधी स्वरूपात मदत जमा करण्यासाठी

 
सोनपेठ (दर्शन) :-
 
मुख्यमंत्री सहायता निधी, 
स्टेट बँक ऑफ इंडिया, मुख्य शाखा मुंबई. खाते.क्र. 10972433751.
(IFSC - SBIN0000300) 
या क्रमांकावर जमा करावा.
या खात्याचा पॅन क्रमांक AAATC0294J तसेच युपीआय नंबर cmrelieffund.mh@sbi असा आहे. 
याव्यतिरीक्त कोणत्याही वैयक्तिक खात्यावर पैसे पाठवू नयेत. 

परदेशातून आलेल्या नागरिकांनी माहिती देणे अनिवार्य

परदेशातून आलेल्या नागरिकांनी माहिती देणे अनिवार्य


औरंगाबाद, (विमाका) दि. 26 :-
 जे नागरिक 1 मार्च 2020 नंतर परदेशातून आले आहेत, त्यांनी आपल्याबद्दलची  संपूर्ण माहिती जिल्ह्याधिकारी कार्यालय किंवा महानगरपालिकेला द्यावी, असे आवाहन विभागीय आयुक्त कार्यालय प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 
   तसेच जीवनावश्यक वस्तुंची कुठल्याही प्रकारची कमतरता भासू दिली जाणार नाही, असेही नमूद करण्यात आले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या सुरू असलेल्या संचारबंदीच्या काळात जनतेला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून शासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. परदेशातून आलेल्या नागरिकांनी स्वतःहुन आपल्या बद्दलची माहिती जिल्हाधिकारी कार्यालय किंवा महानगरपालिकेला द्यावी. तसेच सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा दुकाने, औषधांची दुकानेही उघडी राहतील, त्यामुळे नागरिकांनी भयभीत होऊ नये. सामानाची मोठया प्रमाणात साठवणूक करू नये, असे आवाहनही विभागीय आयुक्त कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
-*-*-*-*-

परदेशातून आलेल्या नागरिकांनी माहिती देणे अनिवार्य

परदेशातून आलेल्या नागरिकांनी माहिती देणे अनिवार्य


औरंगाबाद, (विमाका) दि. 26 :-
 जे नागरिक 1 मार्च 2020 नंतर परदेशातून आले आहेत, त्यांनी आपल्याबद्दलची  संपूर्ण माहिती जिल्ह्याधिकारी कार्यालय किंवा महानगरपालिकेला द्यावी, असे आवाहन विभागीय आयुक्त कार्यालय प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 
   तसेच जीवनावश्यक वस्तुंची कुठल्याही प्रकारची कमतरता भासू दिली जाणार नाही, असेही नमूद करण्यात आले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या सुरू असलेल्या संचारबंदीच्या काळात जनतेला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून शासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. परदेशातून आलेल्या नागरिकांनी स्वतःहुन आपल्या बद्दलची माहिती जिल्हाधिकारी कार्यालय किंवा महानगरपालिकेला द्यावी. तसेच सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा दुकाने, औषधांची दुकानेही उघडी राहतील, त्यामुळे नागरिकांनी भयभीत होऊ नये. सामानाची मोठया प्रमाणात साठवणूक करू नये, असे आवाहनही विभागीय आयुक्त कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
-*-*-*-*-

परभणीकर कोरोना ची लढाई घरातुनच जिंकनार तमाम जनतेनी पोलीस, डॉक्टर, प्रशासकीय कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे - राजेश विटेकर ; कोरोना महामारीला सहज घेऊ नका, गांभीर्य ओळखा

परभणीकर कोरोना ची लढाई घरातुनच जिंकनार तमाम जनतेनी पोलीस, डॉक्टर, प्रशासकीय कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे - राजेश विटेकर ; कोरोना महामारीला सहज घेऊ नका, गांभीर्य ओळखा 


सोनपेठ (दर्शन) :- 

कोरोना महामारी हि जागतिक महामारी म्हणून समोर आली आहे. जगात नावाजलेल्या चीन, इटली, जर्मनी, अमेरिका या देशाची कोरोना व्हायरस मुळे दयनीय अवस्था झाली आहे. प्रशासनाने आव्हान करूनही नागरिक गांभीर्याने विचार करत नाहीत.आज एक दिवसीय बंद म्हणजे अब्जावधी रुपयाचे नुकसान परंतु नागरिकांच्या आरोग्याचा पुढे काहीही मोठे नाही म्हणून नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन. आपल्या कुटुंबाला सोडून रात्रंदिवस नागरिकांची सेवा करणाऱ्या प्रतेक पोलीस कर्मचारी, डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी , अंगणवाडी सेविका, आशाताई, ग्रामसेवक, तलाठी, महावितरण कर्मचारी, पाणीपुरवठा कर्मचारी, सफाई कर्मचारी , महसूल कर्मचारी हे आपले घरदार सोडून नागरिकांच्या आरोग्याची सुरक्षितता राहावी म्हणून रात्रंदिवस कार्य करतात या सर्व पोलीस, आरोग्य, महावितरण, पाणीपुरवठा व इतर सर्व कर्मचाऱ्यांना नागरिकांनी सहकार्य करावे तसेच महामारीत स्वार्थी व्यापाऱ्यांनी जीवनावश्यक वस्तूची साठेबाजी करून नफेखोरी करू नये या महामारीच्या विरोधी लढाई आपण परभणीकरांनी म्हणजेच परभणी जिल्ह्यातील तमाम नागरिकांनी एक जुटीने शासकीय, प्रशासकीय कर्मचाऱ्यांना मदत , सहकार्य करावे तसेच परभणीकर कोरोना ची लढाई घरातुनच जिंकनार असे आवाहन मा.जि.प.अध्यक्ष तथा सभापती राजेश विटेकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.एवढेच नाही तर माझ्या वाढदिवस हि घरी थाबुनच साध्या पद्धतीने साजरा करणार असुन कोनीही हार, तुरे घेऊन भेटायला येऊ नये हि मनपुर्वक आपैक्षा असे त्यांनी सा.सोनपेठ दर्शन प्रतिनिधी जवळ सांगीतले.

Wednesday, March 25, 2020

जीवनावश्यक वस्तूंचा मुबलक साठा उपलब्ध, नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी करू नये

जीवनावश्यक वस्तूंचा मुबलक साठा उपलब्ध, नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी करू नये


परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात 21 दिवसांचे लॉकडाऊन सुरू झाले असून या काळात नागरिकांना भाजीपालासह इतर जीवनावश्यक वस्तू उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासनाने आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत.
लॉकडाऊनच्या कालावधीत जिल्ह्यात भाजीपाला, अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा याकरिता जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात असून किराणा दुकानांसमोर ग्राहकांची गर्दी होवू नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. जनतेला सोशल डिस्टन्सींगचे महत्व पटवून दिले जात असून ठराविक अंतरावर ग्राहकांनी शिस्तीत थांबून आपल्या सामानाची खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी किराणा दुकानासमोर ठराविक अंतरावर मार्कींग करून सामानाची खरेदी केली जात आहे. यासाठी जिल्हा प्रशासन, महानगरपालिका अधिकारी-कर्मचारी व आरोग्य विभागामार्फत दुकानदार व ग्राहकांना सुचना देण्यात येत आहेत. तसेच जीवनावश्यक वस्तुंचा मुबलक प्रमाणात साइा उपलब्ध असून नागरिकांनी खरेदी करण्यासाठी दुकानांवर गर्दी करू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

दोन घास भुकेल्या॓साठी जगुया थोडंसं माणुसकीसाठी ; आपल्याला एकांताची काळजी तर अनेकांना खाण्याची चिंता ; अण्णपूर्णा ट्रस्टचं परळी शहरातील भिक्षुक व निराश्रीतांसाठी ॑ पहिलं पाऊल ; अखंडपणे दोन वेळचे मोफत जेवण ‌

दोन घास भुकेल्या॓साठी जगुया थोडंसं माणुसकीसाठी ; आपल्याला एकांताची काळजी तर अनेकांना खाण्याची चिंता ; अण्णपूर्णा ट्रस्टचं परळी शहरातील भिक्षुक व निराश्रीतांसाठी ॑ पहिलं पाऊल ; अखंडपणे दोन वेळचे मोफत जेवण ‌


परळी / सोनपेठ (दर्शन) :-

परळी शहरात करोना व्हायरसच्या पाश्र्वभूमीवर लाॅकडाऊन असल्यामुळे वैद्यनाथ मंदिर व परळी शहर परिसरात असलेल्या अनेक भिक्षुक  निराश्रीत तसेच वंचित यांची उपासमार होवु नये म्हणुन त्यांची उपासमार थांबली पाहिजे या सामाजिक बांधिलकेतुन व आपणही समाजाच काही देणं लागतो या भावनेतून दोन वेळेचे जेवणाची व्यवस्था अखंडपणे चालू आहे .जो पंर्यत परिस्थिती सामान्य होत नाही तोपर्यंत हि व्यवस्था चालुच राहील अशी माहिती अध्यक्ष अनिल लाहोटी तसेच सर्व  पदाधिकारी यांनी दिली

.ज्यांना रोज कमावून रोज ख्याचे त्यांचेत या नवीन लॉक डाऊन मुळे अजुन अडचणीत भर पडली आहे .या लोकांचा चेहऱ्यावरील चिंता पाहून पोटात खड्डा पडत आहे पण याला काहीच उपाय नाही . आणि प्रशासनाने घेतलेले काही नियमांची गरज देखील आहे पण आत्ता आपली जवाबदारी अजुन वाढली आहे .  आता लढाई पुन्हा जोमाने लढावी लागेल अशी भावना देखील त्यांनी व्यक्त केली.ट्रस्ट द्वारे बाराही महीने मंदिर परिसरातील भिक्षुकना जेवण दिले जाते 
परन्तु या कर्फ्यू मधे त्यांच्या सोबतच शहरातील बेघर लोकाना सुद्धा जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे 

हे कार्य मा तहसीलदार साहेब व पोलिस निरीक्षक साहेबांच्या निरिक्षणात  सुचारु पाने शुरू आहे. आपल्या परिसरात असे कुणी भिक्षुक व निराश्रीत बेघर लोक  असल्यास आपणं ८९७५५७०५७० या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले

*________

जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन; जीवनावश्यक वस्तूचा साठा मुबलक असल्याने गर्दी टाळावी ; 9 रुग्णांचे स्वॅब पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे तपासणीसाठी पाठविले ; कोरोना बाह्यरुग्ण विभागात 137 संशयित रुग्णांची तपासणी

जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन;
जीवनावश्यक वस्तूचा साठा मुबलक असल्याने गर्दी टाळावी ; 9 रुग्णांचे स्वॅब पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे तपासणीसाठी पाठविले ; कोरोना बाह्यरुग्ण विभागात 137 संशयित रुग्णांची तपासणी


परभणी / सोनपेठ (दर्शन) :- जिल्ह्यातील सर्व नागरीकांना
२१ दिवसाच्या लॉगडाऊनच्या काळात जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तुंचा आणि अन्न - धान्याचा साठा मुबलक असून कोणताही तुटवडा होणार नाही याची प्रशासनाने काळजी घेतलेली आहे. तरी जीवनावश्यक वस्तू , औषधी आणि अन्नधान्य , भाजीपाला यांची दुकाने पूर्णवेळ सुरू राहणार असल्याने नागरीकांनी नाहक गर्दी करु नये व अफवांना बळी पडु नये. असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
नागरीकांनी काही अडचण असल्यास पोलीस नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रमांक ०२४५२ २२६२४४ व्हॉटसअप क्रमांक - ७७४५८५२२२२ व आपत्ती प्रशासन कक्षातील दूरध्वनी क्रमांक ०२४५२ - २२६४०० येथे संपर्क करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
कोरोना विषाणू संदर्भात जिल्हा रुग्णालयात एकूण 121 रुग्णांची नोंद झाली असून 74 जणांचे स्वॅब घेण्यात आले. त्यापैकी 44 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून 15 स्वॅब अहवाल प्रलंबित आहेत. आजपर्यंत एकूण 15 स्वॅबबाबत पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेने तपासणीची आवश्यकता नसल्याचा निर्वाळा दिला आहे.
जिल्ह्यात परदेशातून आलेले व त्यांच्या सहवासातील एकूण 54 नागरिक निगराणीखाली असून यापैकी 14 नागरिक रुग्णालयात विलगीकरण कक्षामध्ये दाखल झाले आहेत. 107 नागरीकांचे त्यांच्या घरी विलगीकरण करण्यात आले आहेत. त्यांची वैद्यकीय पथकामार्फत फेरतपासणी करण्यात येत असून या 107 रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. आज नवीन 8 संशयीत नागरिकांची जिल्हा रुग्णालय व अधिनस्त संस्थेत नोंद झाली. तर कोरोना बाह्यरुग्ण विभागात 137 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. आज रोजी 9 रुग्णांचे स्वॅब पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
जिल्ह्यात दि. २५ मार्च २०२० रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत कोरोना विषाणु बाधीत एकही रुग्ण आढळून आलेला नाही. तरी जनतेने मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगु नये तसेच अफवावर विश्वास ठेवू नये. असे जिल्हाधिकारी दी म . मुगळीकर आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी कळविले आहे.
-*-*-*-*-

Tuesday, March 24, 2020

परळी वै 150 वर्षापेक्षा जास्त वर्षाची परंपरा शंभु महादेवाच्या वाघाच्या काठीची मिरवणुक कोरोना वायरसच्या धर्तीवर रद्द!

परळी वै 150 वर्षापेक्षा जास्त वर्षाची परंपरा
शंभु महादेवाच्या वाघाच्या काठीची मिरवणुक कोरोना वायरसच्या धर्तीवर रद्द!


परळी / सोनपेठ (दर्शन) :-

150 वर्षापेक्षा जास्त वर्षाची परंपरा असलेल्या परळी वैजनाथ येथील शंभू महादेवाच्या वाघाची काठी व कावड ची मिरवणूक कोरोना वायरसच्या प्रतिबंधात्मक उपायासाठी रद्द करण्यात आली आहे.
चैत्र प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी स्वामी (मठपतींच्या) घरी उभ्या राहणाऱ्या वाघाच्या काठीची व कावडीची दिवसभर पूजा करून दर्शन घेण्याची प्रथा आहे. तसेच साखरेच्या गाठीच्या हाराचा चा पहिला मान शंभू महादेवाच्या काठीला देऊन ती इतरांना दिली जाते.
संध्याकाळी जुन्या परळी विभागातून सवाद्य मिरवणूक काढली जाते त्यावेळी घरोघरीच्या महिला आपल्या घरासमोर महादेवाच्या काठीची व कावडीची पूजा-आरती करून स्वागत करीत असतात व महादेवाचे शिवभक्त ही 23 ते 25 फूट उंच असलेली महादेवाची काठी एका हाताच्या तळ्व्यावर लीलया उचलून नाचवीत असतात व याच आनंदाच्या उत्साहात ती काठी व कावड देशमुखपार येथील देशमुख परिवाराच्या वाड्यावर ( गढीवर ) नेऊन उभी केली जाते. एकादशी पर्यंत काठी व कावडीचा मुक्काम देशमुख परिवार कडेच असतो. एकादशीला प्रभु वैद्यनाथाची भेट घेऊन  काठी व कावडी चे पुन्हा स्वामी ( मठपती ) परिवाराचे घरी आगमन होते अमावस्येपर्यंत गावातील शिवभक्त सवडीप्रमाणे आंबिल आणि घुगऱ्या नैवेद्य करून काठीस आणून दाखवितात व अमावस्येला स्वामी परिवाराकडून महाअंबिली चा प्रसाद केला जातो व या महिनाभराच्या उत्सवाची सांगता होत असते. याच कालावधीत स्वामी परिवार हे वाघाची काठी व कावड घेऊन शंभू महादेवाच्या दर्शनासाठी  शिखर शिंगणापूर येथे जात असतात. 
यावर्षी कोरोना व्हायरसने घातलेला धुमाकूळ व प्रशासन करत असलेल्या उपाययोजनेस अनुकूल राहण्यासाठी महादेवाची काठी स्वामी परिवार जंगम गल्ली गणेशपार येथे विधिवत उभी केली जाईल व मिरवणूक न काढता स्वामी यांच्या घरीच विराजमान राहील संचारबंदीमध्ये शंभू महादेवाच्या पूजेचा खंड पडू नये यासाठी या वर्षाकरिता हा निर्णय घेतल्याचे श्री दयानंद स्वामी मठपती व श्री अमृत शंकरराव देशमुख यांनी संयुक्त पणे जाहीर केले.

Monday, March 23, 2020

महाराष्ट्रात येत्या 31 मार्चपर्यंत बंदी आदेश ; अधिसूचना जारी

महाराष्ट्रात येत्या 31 मार्चपर्यंत बंदी आदेश ; अधिसूचना जारी


मुंबई / परभणी / सोनपेठ (दर्शन) : -

कोविड 19 (करोना विषाणू) याचा प्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा भाग म्हणून विविध कायद्यांतर्गत उपलब्ध असलेल्या अधिकारांचा उपयोग करून संपूर्ण महाराष्ट्रात येत्या 31 मार्चपर्यंत बंदी आदेश लागू करण्याची अधिसूचना आज मुख्य सचिव श्री. अजोय मेहता यांनी जारी केली.

*या अधिसूचनेनुसार-*
            अत्यावश्यक आणि नाशवंत वस्तू वगळता अन्य सर्व वस्तूंच्या दळणवळणासाठी राज्याच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. एसटी महामंडळाच्या बसेस आणि मेट्रो यांसह एका शहरातून दुसऱ्या शहराला जोडणाऱ्या सर्व सार्वजनिक वाहतूक सेवा बंद असतील. चालकाव्यतिरिक्त अन्य दोन व्यक्तींसाठी टॅक्सी तर एका प्रवाशासह ॲटो रिक्षा यांना अधिसूचनेत नमूद केलेल्या कारणांसाठी वाहतूक करता येईल. अत्यावश्यक वैद्यकीय सेवेसाठी प्रवासी वाहतूक करण्यासल  अधिसूचनेत मान्यता देण्यात आली आहे. अत्यावश्यक वस्तू, आरोग्यसेवा आणि या अधिसूचनेत नमूद करण्यात आलेल्या बाबी यांकरिता वाहनचालकांव्यतिरिक्त एका व्यक्तीला खासगी वाहन उपयोगात आणता येईल.
एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या बससेवा आणि खासगी प्रवासी वाहतूक सेवा यांना बंदी असेल.
            विलगीकरणात राहण्याचा निदेश देण्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीने त्या निदेशाचे पालन करणे आवश्यक आहे अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल आणि त्याला शासकीय विलगीकरण व्यवस्थेत स्थलांतरित केले जाईल.
            सर्व रहिवाशांनी घरातच थांबावे. केवळ वरील कारणांसाठी त्यांना बाहेर पडता येईल. तथापि, बाहेर पडल्यानंतर त्यांना परस्परांपासून किमान अंतर राखण्याचा दंडक पाळणे आवश्यक असेल.
            सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येण्यास बंदी असेल.
            व्यावसायिक आस्थापने, कार्यालये, कारखाने, कार्यशाळा, गोदामे आदींसह सर्व दुकानांचे व्यवहार बंद असतील. तथापि, वस्तूंची निर्मिती करणाऱे व प्रक्रिया सातत्य (कंट्युनिअस प्रोसेस) आवश्यक असलेले कारखाने, औषध विक्री आदी सुरू ठेवण्यास परवानगी असेल. याशिवाय, डाळ, तांदूळ, अन्नधान्यविषयक बाबी, दूधविषयक पदार्थ, पशुखाद्य अशा अत्यावश्यक वस्तूंच्या निर्मितीच्या कारखान्यांना त्यांची कामे सुरू ठेवण्यास परवानगी असेल.
            शासकीय कार्यालये आणि सुरू ठेवण्यात येणारी दुकाने आणि आस्थापने यांनी अतिशय कमीतकमी कर्मचारीवर्ग असण्याची आणि परस्परांपासून किमान अंतर राखण्याची (जसे चेकआऊट काउंटरवर तीन फुटाचे अंतर राखण्यासाठी जमिनीवर खुणा करणे ) दक्षता बाळगावी.
            अत्यावश्यक वस्तू व सेवा पुरविणाऱ्या खालील दुकाने आणि आस्थापने यांना वरील निर्बंधातून सूट देण्यात आली आहे.
1. बॅंका/ एटीएम, विमा, फिन्टेकसेवा आणि अन्य संबंधित सेवा
2. मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे
3. टेलिकॉम, टपाल, इंटरनेट, डेटासेवा यांसह माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सेवा.
4. अत्यावश्यक वस्तूंची पुरवठा साखळी आणि वाहतूक
5. शेतमाल आणि अन्य वस्तूंची निर्यात आणि आयात
6. खाद्य पदार्थ, औषधे आणि वैद्यकीय उपकरणे यांसह आत्यावश्यक वस्तूंचे ई-कॉमर्सद्वारे वितरण
7. खाद्य पदार्थ, किराणा, दूध, ब्रेड, फळे, भाजीपाला, अंडी, मांस, मासे यांची विक्री, वाहतूक आणि साठवण
8. बेकरी आणि पाळीव प्राण्यांसाठीचे खाद्यपदार्थ आणि पशुवैद्यकीय सेवा
9. उपाहारगृहांमधून घरपोच सेवा
10. रूग्णालये, औषधालये आणि चष्म्याची दुकाने, औषधांचे कारखाने, विक्रेते आणि वाहतूक
11. पेट्रोल पंप, एलपीजी गॅस, ऑईल एजन्सीज त्यांची साठवण आणि त्यांच्याशी संबंधित वाहतूक व्यवस्था
12. अत्यावश्यक सेवांकरिता खासगी संस्थांमार्फत पुरविल्या जाणाऱ्या सुरक्षासेवेसह अन्य सेवा देणाऱ्या संस्था
13. अत्यावश्यक सेवांना किंवा कोविड १९ प्रतिबंधासाठी होणाऱ्या प्रयत्नांना मदत करणारी खासगी आस्थापने.
14. वरील बाबींशी संबंधित पुरवठा साखळी
15. तत्वतः वरील सर्व निर्बंध, लोकांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्यासाठी आहेत. वस्तूंच्या दळण-वळणावर निर्बंध घालण्यासाठी नाहीत, हे सर्व अंमलबजावणी कार्यालयांनी लक्षात घ्यावे, असेही अधिसूचनेत म्हटले आहे.
            राज्य शासनाचे  विभाग आणि कार्यालये आणि सार्वजनिक उपक्रम हे फक्त अत्यावश्यक सेवा देण्यासाठीच कार्यरत राहतील.
कोणत्याही संप्रदायांची सर्व धार्मिक स्थळे  सुयोग्य अशा प्रतिबंधात्मक आदेशान्वये बंद करण्यात येतील.
 बंदीच्या काळात अत्यावश्यक गरजेच्या वस्तुंच्या पुरवठ्याबाबत कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जातील.
 कोविड-19 च्या रूग्णांना योग्य त्या आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व  खाजगी आणि शासकीय रूग्णालयातील वैकल्पिक शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात येतील.
 गरज भासल्यास, आरोग्य सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी, सर्व विभागीय आयुक्त, महानगर पालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना रूग्णालयाच्या आसपास उपलब्ध जागांचा शोध घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सध्या करोना विषाणू मुक्त असलेल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे त्यांच्या जिल्ह्यात बाहेरून वाहने येण्यास प्रतिबंध करणारे आदेश काढू शकतील. या जिल्ह्यांमध्ये वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बुलडाणा, अमरावती, अकोला, वाशिम, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, बीड, जालना, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे. हा आदेश अत्यावश्यक वैद्यकीय कारणासाठी लागू राहणार नाही.
 सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त, महानगरपालिकांचे आयुक्त आणि इतर संबंधित संस्था, आस्थापना यांचे सक्षम प्राधिकारी यांना, मानवीय व न्यायपूर्ण पद्धतीने वरील सर्व उपाययोजना  व तरतूद यांची अंमलबजावणी करण्यासाठी अधिकार देण्यात आले आहेत.
 कोणतीही व्यक्ती, संस्था या तरतुदींचा भंग करतील त्यांच्यावर साथ रोग कायदा - 1897 , आपत्ती व्यवस्थापना कायदा - 2005 आणि इतर कायदे व विनियमने यानुसार कार्यवाही करण्यात येईल अथवा सद्हेतुने कार्यवाही करणाऱ्या व्यक्तीविरूद्ध वा तसा हेतू असणाऱ्या व्यक्तींविरूद्ध कायदेशीर कारवाई केली जाणार नाही.
 या आधी वेगवेगळ्या प्राधिकाऱ्यांनी निर्गमित केलेले आदेश हे या आदेशांशी सुसंगती राखून अंमलबजावणी संस्था लागू करतील.
          000

राज्यात आजपासून संचारबंदी ; जिल्ह्यांच्या सीमा देखील बंद करणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यात आजपासून संचारबंदी ; जिल्ह्यांच्या सीमा देखील बंद करणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


मुंबई / परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

कोरोना विषयक सातत्याने माहिती देणे माझे कर्तव्य आहे , मी सर्वाना काळजीपोटीच आपल्याला या सुचना देतो.  

आपण आता अगदी निर्णायक टप्प्यावर आलो आहोत. आपण कोरोनाचा प्रादुर्भाव जर आत्ताच रोखला  नाही तर जगात होते आहे तसे थैमान होईल  

एक लक्षात घ्या, कालचा दिवस होता त्यासाठी मी आपल्याला धन्यवाद दिलेच आहे. सर्वांनी जनता कर्फ्यू चांगला पाळला. थाळ्या, घंटा वाजविल्या पण हे सगळे कोरोनाला घालविण्यासाठी नव्हते तर वैद्यकीय क्षेत्रात सतत काम करीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी होते. 

काल राज्यात १४४ कलम लावले होते आता मला राज्यात  संचार बंदी लावावी लागते आहे.

खासगी वाहने अत्यावश्यक कारणांसाठी असेल तरच सुरु राहतील. रिक्षा, टैक्सी यामधील प्रवाशांची संख्या मर्यादित असेल.  

काल आपण इतर राज्याच्या सीमा बंद  केल्या होत्या आज आपण राज्यातील जिल्ह्यांच्या सीमा देखील बंद करीत आहोत. या वाहतूक बंदीत खासगी वाहने देखील आली.

देशांतर्गत विमानतळ तत्काळ बंद करावे अशी विनंती मी पंतप्रधानांना केली आहे 

जीवनावश्यक वस्तू, औषधे, अन्न धान्य तसेच त्यांची ने आण करणारी वाहने सुरु राहतील. पशू खाद्य मिळेल, पशूंचे दवाखानेही उघडे राहतील. कृषीमालाशी सबंधित वाहतूक सुरु राहील. 

खुपदा विनंती करूनही पालन होत नसल्याने मला नाईलाजाने हा निर्णय घ्यावा लागत आहे. 

सर्व धर्मीयांची प्रार्थना स्थळे पूर्णपणे बंद राहतील

प्रसंगी आशा, अंगणवाडी, होमगार्ड्स यांना देखील वैद्यकीय बाबतीत प्रशिक्षण देऊन तयार करीत आहोत. 

सर्व माध्यमांना देखील मी धन्यवाद देतो. कोरोनाविषयी आपण चांगली जनजागृती करीत आहात 

ज्यांना प्रादुर्भाव झालेला नाही त्यांनी देखील काळजी घेणे खूप आवश्यक आहे. 

घरी विलगीकरण केलेल्यांनी सरकारच्या सूचना पाळायच्या आहेत 

ही कठोर पाउले केवळ जनतेच्या  हितासाठी आहेत.

परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव व राजगुरू शहीदांना अभिवादन

परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात  क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव व राजगुरू शहीदांना अभिवादन


परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

जिल्हाधिकारी कार्यालयात 23 मार्च शहीद दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी डॉ.संजय कुंडेटकर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी -कर्मचाऱ्यांनी शहिदांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
               -*-*-*-*-

Sunday, March 22, 2020

जीवनावश्यक वस्तू पुरवठा आस्थापना सुरूच राहणार - जिल्हाधिकारी दी. म. मुगळीकर

जीवनावश्यक वस्तू पुरवठा आस्थापना सुरूच राहणार - जिल्हाधिकारी दी. म. मुगळीकर


परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

जिल्ह्यातील नागरिकांनी जीवनावश्यक वस्तू पुरवठा करणा -या आस्थापना सुरुच राहणार असल्यामुळे नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या जीवनाश्यक वस्तूंचा मोठ्या प्रमाणावर साठा करून ठेवू नये तसेच अन्न-धान्य व जीवनाश्यक वस्तूंची खरेदी नियमित गरजेप्रमाणे करावी. असे आवाहन जिल्हाधिकारी दी. म. मुगळीकर यांनी केले आहे.

कोरोना विषाणूचे संशयीत रुग्ण शेजारील जिल्ह्यात आढळून आल्याची बातमी आहे . यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणूच्या संसर्गात अधिक वाढ होऊ न देता तात्काळ उपाययोजना आखणे आवश्यक आहे . तसेच ज्याद्वारे कोरोना विषाणू संसर्ग वाढू नये तसेच नागरिकांची गर्दी एकवटू नये म्हणून जिल्ह्यात जीवनाश्यक वस्तू पुरविणा-या आस्थापना वगळून इतर आस्थापना दि. ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवण्याबाबत आदेशीत केले आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक असेल एवढेच अन्न- धान्य , आणि इतर अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करावी तसेच कोरोना विषाणूचा संसर्गाबाबत तपासणीसाठी आणि अधिक माहितीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय क्रमांक ०२४५२ - २२३४५८ व जिल्हा प्रशासनाशी ०२४५२ - २२६४०० या क्रमांकावर संपर्क साधावा.
-*-*-*-*-

Saturday, March 21, 2020

सोनपेठकरांनी भरवला शनिवारीच बाजार ; प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष कोरोना महामारीस आमंत्रण 


सोनपेठ (दर्शन) :-
 
जगभर कोरोना या महामारीचे स्वरूप घेत असून त्याला प्रतिबंध करण्यासाठी ते रोखण्यासाठी प्रशासन मोठ्या उपाययोजना करत असतांनाही नागरिक मात्र कोरोनाच्या जीवघेण्या संकटाला गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
जीवघेणा संसर्गजन्य असलेल्या कोरोनाच्या उपद्रवाने आता महामारीचे स्वरूप घ्यायला सुरुवात केली आहे.
महाराष्ट्र राज्य या महामारीच्या दुसऱ्या टप्प्यात आले असून राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या आता पन्नाशी पार करत आहे. राज्यात याने महाभयंकर स्वरूप धारण करू नये यासाठी राज्यशासन आटोकाट प्रयत्न करत आहे.
शासन सर्वच पातळीवर दक्ष राहून या जीवघेण्या रोगाची शृंखला तोडण्याची जोरदार तयारी करत आहे. परंतु नागरिक मात्र या प्रयत्नांना हरताळ फासत असल्याचे दिसून येत आहे.
कोरोना हा रोग एकमेकांच्या संपर्कातून फैलावला जात आहे. त्यामुळे नागरिकांचा संपर्क टाळण्यासाठी नागरीकांनी एकत्र न येण्याबाबत सरकार वारंवार सूचना करत आहे.
त्यासाठी राज्यात १४४ कायदा लागू करून सरकारने कुठल्याही ठिकाणी पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास प्रतिबंध केला आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षितता म्हणून अशा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत आहे. परंतु स्थानिक नागरिक मात्र या कुठल्याही विषयाला गांभीर्याने घेत नसल्याचे स्पष्ट होत आहे.
 दि २१ रोजी जिल्हाधिकारी परभणी यांच्या आदेशानुसार सोनपेठ शहरातील संपुर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. यातुन जीवनावश्यक वस्तुची दुकाने भाजीपाला, दुध, किराणा यांची दुकाने वगळण्यात आली होती .नागरीकांचा संपर्क तोडुन कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असतांना आज बंद च्या दिवशी भाजीपाल्याच्या दुकांनांना सुट असल्याने शहरात फिरुन अथवा लांब अंतराने बसुन गर्दी न जमवता भाजी पाला विकण्याचे न प मुख्याधिकारी यांनी तोंडी आदेशित करुनही याकडे भाजीपाला, फळ विक्रत्यांनी दुर्लक्ष करुन डाँ बाबासाहेब आंबेडकर चौकात आपली दुकाने थाटली .त्यात नागरीकांनी आठवडी बाजाराप्रमाने गर्दी केली होती .भाजीपाल्याची दुकाने रोजच उघडी ठेवण्यात येणार असतांना उगाचच नागरीक गर्दी करत आहेत.नागरीकांच्या भितीचा फायदा घेत भाजी विक्रेत्यांनी भाजीचा दर चौपट करुन ग्राहकांची चांगलीच लुट केली .कलम १४४ लागु करण्यात आल्यावर त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असलेले सोनपेठ पोलीस कोरोना बाबत दक्ष नसल्याचे दिसुन येते बाजारात अनावश्यक गर्दी करणाऱ्या सोबत कुठलीही सक्ती करत नसल्याचे यावरुन दिसुन येते.

कोरोना या रोगासोबत लढण्यासाठी नागरीकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे होणे गरजेचे असतांना नागरिक बेजबाबदारपणे वागून या रोगाला आमंत्रीतच करत असल्याचे चिञ दिसून येत आहे.तर प्रशासन ही या बाबत फारसे दक्ष नसल्याचे पाहावयास मिळते
.