राजीव गांधी महाविद्यालयात संत सेवालाल महाराज यांना अभिवादन
सोनपेठ (दर्शन) :-
संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करून राजीव गांधी महाविद्यालयात सेवालाल महाराजांची २८० जयंती साजरी करण्यात आली.
आज शनिवार रोजी झालेल्या या कार्यक्रमात, राजीव गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य बालाजी शिंदे यांनी सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी उपस्थित प्रा. नर्गिस शेख प्रा. चंद्रशेखर किरवले यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमास लायब्ररियन रेखा कांबळे, दिक्षा शिरसाट, कैलाश भालेराव, माऊली कदम, विठ्ठल भारती, वनमाला शिंदे आदी कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment