Tuesday, February 4, 2020

बहिःशाल व्याख्यानमालेची शेवटच्या माणसाशी नाळ - प्राचार्य विठ्ठल घुले

बहिःशाल व्याख्यानमालेची शेवटच्या माणसाशी नाळ - प्राचार्य विठ्ठल घुले 
सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ तालुक्यातील मौजे डिघोळ येथे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड सलग्नित कै.र.व.महाविद्यालय सोनपेठच्या बहिःशाल शिक्षण केंद्रांतर्गत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख व्याख्याते म्हणुन प्राचार्य डाॅ.विठ्ठल घुले होते. 
     बहिःशाल व्याख्यान देताना घुले यांनी राष्ट्रीय एकात्मतेला बाहेरच्या जगातून धोका नाही तर देशातील जातीयवाद, धर्मांध शक्ती व असमानता यांचा धोका आहे असे म्हटले. देशातील जनता आजही गरिबी दारिद्र्य, शिक्षण, आरोग्य यासारख्या समस्या दूर झाल्या नाहीत. आजही खेड्यात शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध नाहीत म्हणुन बहिःशाल सारख्या व्याख्यान माला सामान्य माणसाच्या जीवनात ज्ञानाची पनती पेटवते. 
      या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डाॅ.मारोती कच्छवे हे होते तर प्रमुख उपस्थितीत पत्रकार बाबासाहेब गर्जे, प्रा.गोविंद वाकणकर, प्रा.श्रीकांत गव्हाणे आदी मान्यवर उपस्थित होते. 
       याकार्यक्रमाला गावकरी मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होती. याकार्यक्रमाचे सूत्रसंचालन बहिःशाल शिक्षण केंद्र प्रमुख प्रा.डाॅ.बापुराव आंधळे यांनी केले तर आभार प्रदर्शन माजी विद्यार्थी कृष्णा आरबाड यांनी केले.

No comments:

Post a Comment