वरपूडकर महाविद्यालयात संत सेवालाल महाराज जयंती साजरी
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ येथील कै. रमेश वरपूडकर महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाच्या वतीने राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत सातपुते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डॉ.सा.द.सोनसळे, प्रा.डॉ. मुक्ता सोमवंशी, आय.क्यु.ए.सी. समन्वयक प्रा.डॉ.मुकुंदराज पाटील, प्रा.गोविंद वाकणकर इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होती. या निमित्ताने इंग्रजी विभागाच्या विद्यर्थिनी कु.नूरजहाँ शेख व कु.गायत्री उबाळे यांनी बनवलेल्या coronavirus या भित्तीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.विठ्ठल जायभाये यांनी केले तर आभार प्रा.पंडित राठोड यांनी मानले. याप्रसंगी महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठया प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी संतुक परळकर, चंद्रपाल पटके, दत्ता सोनटक्के यांनी परिश्रम घेतले.

No comments:
Post a Comment