Saturday, February 15, 2020

जय भवानी शिवजन्मोत्सव आयोजित कवि संमेलनास सोनपेठकरांनी मनातून दिला भव्य प्रतिसाद

जय भवानी शिवजन्मोत्सव आयोजित कवि संमेलनास सोनपेठकरांनी मनातून दिला भव्य प्रतिसाद


सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ येथील अहिल्याबाई होळकर चौकात जय भवानी शिवजन्मोत्सव आयोजित चौथे पुष्प कवि संमेलनात सोनपेठकरांनी दिला भव्य प्रतिसाद या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डॉ.मारोती कच्छवे तर प्रमुख पाहुणे डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.बालाजी पारसेवार, डॉ.राजकुमार फड, डॉ.धनंजय पवार तसेच कविवर्य राजेश रेवले, संतोष नारायणकर,मारोती डोईफोडे, सुरेश हिवाळे, मणिक पुरी, हनुमान व्हरगुळे, अरविंद सगर, गजेंद्र भोसले, सौ.सुनिता कच्छवे, स्नेहल कदम, प्रकाश राठोड, संतोष चव्हाण, दामोदर सातपुते, आण्णा नायकोडे, प्रा. डॉ. विठ्ठल जायभाये, वैशाली वानखेडे, ऋषिकेश सुरवसे आदींनी प्रथम शिव शिल्पाचे पूजन, दीपप्रज्वलन व मशाल पेटवून तसेच संत सेवालाल महाराज जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन करून कविसंमेलनास सुरुवात करण्यात आली या प्रसंगी सर्व कविवर्यांनी स्वलिखित रचना जशा गझल माणसाची, शिवगीत, सामाजिक,  भारतीय माय, बघ बघ करत गाडी स्टेशनात आली, स्वप्नात आले छत्रपती, शेतकरी माय, इंग्लिश स्कूल शिक्षकांची व्यथा, पुलवामा शहिदांना सलाम, फळ मिळेल बाळा रे महेनत केल्यावर, शेतकरी आत्महत्या का करतो ?, आईची माया, सांग ना ग आय !, जय भवानी शिवजन्मोत्सव समितीच्या मैत्रीवर, सरकारचा कारभार, गुरुजींचेच हे वैभव, माय-बाप, वीर जवानांची गाथा, माणुसकीच ही खरी जात, संसाराचा गाडा दोघे मिळून हाकू, बाप आणि सूर्याची लढाई, शेतकरी आहे माझा कणा ताठ आहे !, आधी मधुर रचनांचे सर्व उपस्थित कविवर्य यांनी स्वमुखातून स्वलिखित कवितांचे लयबद्ध सादरीकरण करून सोनपेठकरांना कधी हसू तर कधी आसू आणून गेली त्यामध्ये राजेश येवले सरांच्या माय घराचा उंबरा ! माय अंगनी तुळस !! बापाच्या मंदिराची ! माय आसते कळस !! या ओळीने संपूर्ण परिसरात स्तब्दता पसरली सर्व कविंना दाद ही टाळ्यांच्या कडकडाटात दिली गेली. याप्रसंगी सर्व कवींना जय भवानी शिवजन्मोत्सव समिती च्या वतीने प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व पुष्प देऊन सन्मान करण्यात आला अध्यक्षीय समारोपात प्रा.डॉ.मारोती कच्छवे यांनी अप्रतिम सादरीकरण सर्व विषयाला हात घालत मन जिंकली सर्व कवींचे अभिनंदन करून आयोजकांच्या या संमेलनास तसेच सर्व उपक्रमास शुभेच्छा व्यक्त केल्या व समारोप प्रसंगी शेतकरी गीताने सांगता केली तर आभार जय भवानी शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष बळीराम काटे यांनी मानले तसेच या कविसंमेलनाचे अप्रतिम असे सूत्रसंचालन प्रा.सखाराम कदम व राजकुमार धबडे यांनी केले यावेळी सर्व कवींनी जय भवानी शिवजन्मोत्सव समितीचे आभार व्यक्त केले.

No comments:

Post a Comment