Sunday, February 16, 2020

कै.राजीवगांधी अनु. जाती जमाती निवासी मा.आश्रम शाळेत संतसेवालाल महाराज जयंती साजरी पारंपरिक पद्धतीने चढविला भोग

कै.राजीवगांधी अनु. जाती जमाती निवासी मा.आश्रम शाळेत  संतसेवालाल महाराज जयंती साजरी 
पारंपरिक पद्धतीने चढविला भोग










सोनपेठ (दर्शन) :- 

सोनपेठ तालुक्यातील खडका येथील कै. राजीव गांधी अनु.जाती जमाती निवासी मा.आश्रम शाळेत बंजारा समाजातील महान संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रतिमा पुजन व पारंपरिक पद्धतीने भोग चढविण्यात आला. त्याचप्रमाणे निवासी विद्यार्थ्यांसाठी महाप्रसाद करण्यात आला होता. 
      यावेळी कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक  डी.एल.सोनकांबळे अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाची सुरुवात संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली यावेळी शाळेतील सहशिक्षक यु. डी. राठोड यांनी संत सेवालाल महाराज यांची माहिती दिली. बंजारा समाजातील समाज सुधारक संत सेवालाल महाराज यांनी समाजाला क्रांतिकारी विचारांचे दिलेले बोल वास्तववादी विचार करण्यास भाग पाडतात. संत सेवालाल यांनी दिलेल्या सेवाभावाची शिकवण बंजारा समाजाने आत्मसात करावी असे आवाहन मुख्याध्यापक सोनकांबळे यांनी केले. यावेळी पारंपरिक पद्धतीने भोग चढविण्यात आला. त्याचप्रमाणे कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले व संत सेवालाल महाराज यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. 
    सुत्रसंचलन शिक्षक एस. एम. राठोड यांनी केले प्रास्ताविक सहशिक्षक एस. जी. चव्हाण यांनी केले. आभार प्रदर्शन सहशिक्षक विजय महाजन यांनी केले. कार्यक्रमास शिक्षक वृंद,शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment