Wednesday, February 26, 2020

जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळेची शेख बुशरा गो गर्ल स्पर्धेत तालुक्यात द्वितीय

जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळेची शेख बुशरा गो गर्ल स्पर्धेत तालुक्यात द्वितीय 


सोनपेठ (दर्शन):- 

सोनपेठ तालुकास्तरीय केवळ मुलींसाठी खडका येथे गो गर्ल ही स्पर्धा जिल्हा परिषदेच्या वतिने आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळेची शेख बुशरा एजाज ही वर्ग 7 वी अ ची मुलगी या स्पर्धेत 100 मीटर धावणे तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळवत यश संपादन केले .तिला मार्गदर्शन रविकुमार स्वामी यांनी केले.तिच्या या यशामुळे तिचे गट विकास अधिकारी सचिन खुडे, गट शिक्षणाधिकारी शौकत पठाण, केंद्रप्रमुख गणपत कोटलवार, मुख्याध्यापक प्रदीप गायकवाड, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा संपादक किरण स्वामी तसेच उपाध्यक्ष व सर्व सदस्य सदस्य आदीसह पालक वर्गातून शेख बुशरा एजाज हिचे अभिनंदन तसेच पुढील कार्यास शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.

No comments:

Post a Comment