Friday, February 28, 2020

भारताची जनगणना 2021 साठीच्या प्रशिक्षण सत्राचे - जिल्हाधिकारी श्री.मुगळीकर यांच्या हस्ते उदघाटन

भारताची जनगणना 2021 साठीच्या प्रशिक्षण सत्राचे - जिल्हाधिकारी श्री.मुगळीकर यांच्या हस्ते उदघाटन                        
     
   
 परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

भारताची जनगणना 2021 साठी सर्व चार्ज अधिकारी व सेन्सेस क्लार्क (जनगणना लिपीक/अव्वल कारकुन) यांचे जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी येथे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या दि.28 व 29 फेब्रुवारी 2020 रोजीच्या दोन दिवसीय प्रशिक्षणाचे उदघाटन जिल्हाधिकारी डी.एम.मुगळीकर यांच्या हस्ते संपन्न झाले.  यावेळी उपसंचालक डी.बी. गोंदे, मारुती सुलेभावी, व्ही.जे.परब, एस.एस. पराते, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी डॉ.संजय कुंडेटकर, उपजिल्हाधिकारी अरविंद लोखंडे आदि प्रमुख उपस्थित होते. यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी श्री.मुगळीकर यांनी जनगणना विषयक सर्व माहितीचे संकलन हे मोबाईल ॲपद्वारे होणार असल्याचे सांगितले तसेच माहिती संकलन पध्दती, मोबाईल ॲप, पत्रकावर माहिती भरणे, घरोघरी भेटी देवून सौजन्याने माहिती संकलीत करावी असे आवाहनही केले.  प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी केले तर उपसंचालक डी.बी.गोंदे यांनी प्रशिक्षणार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणास उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, मुख्याधिकारी, नायब तहसिलदार यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 -*-*-*-*-

No comments:

Post a Comment