परभणी येथे होणाऱ्या धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा ; भा.ज.प. जिल्हा चिटणीस शिवाजीराव मव्हाळे यांचे आवाहन
सोनपेठ (दर्शन) : -
परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने परभणी येथिल जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. 20 फेब्रुवारी 2020 गुरुवार रोजी होणाऱ्या या आंदोलनास तमाम शेतकरी व भाजपा पदाधीकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्यने सहभागी होण्याचे आवाहन भाजप जिल्हा चिटणीस शिवाजीराव मव्हाळे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाचे 25 हजार हेक्टरी शासन निर्णयाप्रमाणे तत्काळ अदा करावे,
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करून सातबारा कर्ज मुक्त करावा,
शेतकऱ्यांच्या पाल्याने घेतलेले शैक्षणिक कर्ज तत्काळ माफ करावे,
सोयाबीन पिकाला प्रती हेक्टरी 30 हजार रुपये प्रमाणे तत्काळ पीक विमा देण्यात यावा,
दिवसभरात किमान बारा तास पूर्ण दाबाने वीज पुरवठा करण्यात यावा आदीसह विविध मागण्यांसाठी 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन होणार आहे.
तरी या होणाऱ्या आंदोलनात तमाम शेतकरी व भाजपा पदाधीकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्यने सहभागी होण्याचे आवाहन भाजप जिल्हा चिटणीस शिवाजीराव मव्हाळे यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment