Sunday, February 16, 2020

धडाडीची अंजु - देवेंद्र भुजबळ. संपर्क मो.नं.9869484800

धडाडीची अंजु -  देवेंद्र भुजबळ. संपर्क मो.नं.9869484800


मुबंई / परभणी / सोनपेठ (दर्शन ) :-

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात मीं वृत्त शाखेचा उपसंचालक असताना दरवर्षी  विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपूर येथे जाणे,रहाणे होई.खूप जण भेटत,खूप ओळखी होत. अशाच एका अधिवेशनात त्यावेळी पत्रकार असलेल्या अंजु  कांबळेची ओळख झाली. लहान चणीची ही मुलगी पत्रकार म्हणून इतक्या आत्मविश्वासाने वावरते,हे पाहून मला तिचं कौतुक वाटायला लागलं.पुढे तिच्या गुणवत्तेवर ती माहिती व जन संपर्क महासंचालनालयात उपसंपादक म्हणून निवडल्या गेली आणि तिची नेमणूक मंत्रालयात झाली. पत्रकार अंजु आमची सहकारी झाली!                                   अंजुच्या धडाडीच्या वाटचालीचा मी एक साक्षीदार आहे.अत्यन्त प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, नोकऱ्या करत  अंजुने एम ए, राज्यशास्त्र, लोक प्रशासन,डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा, पत्रकारिता पदवी संपादन केली.  सुनील निमसरकर, 
 बारावीत ती नागपूर वाणिज्य शाखेत १९९८ साली  नागपूर जिल्ह्यातुन गुणवत्ता यादीत आठव्या क्रमांकावर होती ! 

घरची परिस्थिती हलाखीची   असल्यामुळे टेलिफोनबुथवर दरमहा ५०० रुपये महिन्याने तिने काम केले काम केले.  सेल्स गर्ल म्हणून देखील ५०रु रोजाने  तिने काही काळ काम केले. 

त्यानंतर गांधीबागेतील पंजाब मशीन टूल्स या दुकानात ३ वर्षं काम केले.  त्यासोबत पदवी अभ्यासक्रम, माखनलाल चतुर्वेदी पत्रकारिता विश्वविद्यालय, भोपाळच्या नागपूर केंद्रामधून पत्रकारिता अभ्यासक्रम पूर्ण केला. या अभ्यासक्रमानन्तर तिने तिच्या आवडीच्या माध्यम क्षेत्रात प्रवेश केला. दैनिक पार्लमेंट,
 वृत्तरत्न सम्राट (नागपूर प्रतिनिधी)  दैनिक भास्कर, सामाजिक समीकरण (मासिक) येथे पत्रकार म्हणून काम केले.
 
माहिती व  जनसंपर्क महासंचालनालयात प्रचंड स्पर्धेत ती उपसंपादक म्हणून निवडल्या गेली. महासंचालनालयात ती १जुलै २००८ साली ती मुंबईत रुजू झाली. पुढे मुंबईतुन तिची बदली नवी दिल्ली येथील  महाराष्ट्र परियच केंद्रात झाली. महाराष्ट्र राज्याच्या राजधानीत काम करणारी अंजु देशाच्या राजधानीत पोहोचली. तिथेच तिला पदोन्नती मिळून ती माहिती अधिकारी झाली. आजही ती तिथे कार्यरत आहे.दरम्यान तिचा विवाह होऊन ती अंजु कांबळेची, अंजु निवसरकर झाली.अंजुने स्वतःला केवळ घरदार, नोकरी पुरतेच मर्यादित ठेवले नाही. स्वतः ज्या परिस्थितीतुन ती गेली, तिची जाण तिने ठेवली.दिल्लीत गली पाठशाला या स्वयंसेवी संस्थेबरोबर ती काम करतेय.ही संस्था झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना मोफत शिकवणी देते, शाळा सोडाव्या लागलेल्या मुलांना पुन्हा शाळेत  प्रवेश घेण्यास प्रोत्साहन देत असते.
अखिल भारतीय सिद्धार्थ  कल्याण या  सामाजिक संस्थेचीही ती  सदस्य आहे .याशिवाय विविध प्रेरणादायी व्यक्ती,संस्था,उपक्रम यावर ती सातत्याने लिहीत असते.ति नागपूर - मुंबई- दिल्ली असा तिचा सुवर्ण त्रिकोण आहे.                           तिच्या प्रशंसनीय कामाची दखल घेऊन तिला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.अंजु ,तुझी पुढची वाटचाल अशीच सुरू ठेव.तुझ्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.                                 

No comments:

Post a Comment