Saturday, February 8, 2020

पंकजा मुंडे यांना भाजप प्रदेशाध्यक्षपदी संधी

 पंकजा मुंडे यांना भाजप प्रदेशाध्यक्षपदी संधी


मुंबई / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

भारतीय जनता पक्षाच्या आगामी प्रदेशाध्यक्षाची निवड येत्या १६ फेब्रुवारी रोजी नवी मुंबईत होणाऱ्या मेळाव्यात करण्यात येणार असून, नवीन चेहऱ्याला संधी मिळणार का, तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात बोलावणे येणार का ? याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

माजी मुख्यमंत्री फडणवीस यांना केंद्रात बोलावणे आले तर त्यांच्या जागी म्हणजे विधान सभेचे विरोधी पक्षनेते म्हणून चंद्रकांत पाटील यांची वर्णी लागेल, तर प्रदेशाध्यक्षपदी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, विनोद तावडे अथवा पंकजा मुंडे यांच्यापैकी एकाला संधी दिली जाईल.

भाजपच्या जिल्हा तथा शहर पातळीवरील संघटनात्मक बदल पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. तसेच मुंबई प्रदेशाध्यक्षाचीही निवड करण्यात येणार आहे. नवी मुंबई येथे सुमारे ११ हजार प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत राज्य परिषद घेण्यात येणार आहे. यावेळी नव्या प्रदेशाध्यक्षांची निवड जाहीर करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी जाहीर केले आहे. भाजपचा संघटनात्मक पातळीवर निवडणुकीचा कार्यक्रम पार पाडण्यात आला आहे. यात जिल्हाध्यक्ष, मंडळाध्यक्ष, बूथ अध्यक्ष यांच्या निवडीचा कार्यक्रम पार पाडला आहे. यानंतर सर्वांत शेवटी प्रदेशाध्यक्ष, मुंबई अध्यक्ष यांची निवड केली जाते.

No comments:

Post a Comment