Friday, February 28, 2020

जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळेत विज्ञान दिना निमित्त प्रदर्शनाचे माणिकअप्पा निलंगे यांच्या हस्ते उदघाटन

जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळेत विज्ञान दिना निमित्त प्रदर्शनाचे माणिकअप्पा निलंगे यांच्या हस्ते उदघाटन



सोनपेठ (दर्शन) :-

जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळेत दिनांक 28 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी ठीक 11 वाजता राष्ट्रीय विज्ञान दिना निमित्त सर्व विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी, शिक्षक व शिक्षिका यांच्या मार्गदर्शनात भव्य असे विविध विज्ञानाच्या प्रयोगांची प्रात्यक्षिकासह सादरीकरण केले. कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी प्राचार्य माणिकआप्पा निलंगे सर, माजी केंद्रप्रमुख विजयकुमार पोकळे सर, प्रमुख उपस्थितीत शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा संपादक किरण स्वामी, सदस्य बाबासाहेब कसबे व मुख्याध्यापक प्रदीप गायकवाड आदींच्या प्रमुख उपस्थितीत प्रथम रिबीन कापून उद्घाटन संपन्न झाले. ततनंतर सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते भारतीय शास्त्रज्ञ डॉ.सी.व्ही.रमण व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने सुरुवात करण्यात आली मान्यवरांचे स्वागत सर्व शिक्षक, शिक्षिका व विज्ञान समितीच्या विद्यार्थ्यांनी पुष्प देऊन केले. प्रमुख मार्गदर्शक माजी प्राचार्य माणिकअप्पा निलंगे व केंद्रप्रमुख विजयकुमार पोकळे यांनी आपल्या मनोगतातून सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींना शुभेच्छा व्यक्त करून सर्व शिक्षक व शिक्षकांचे अभिनंदन करून सर्वांचे कौतुक केले. यावेळी विविध घोषवाक्याचे सर्व मान्यवर व शिक्षक आणि शिक्षिका यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. अप्रतिम असे सूत्रसंचालन श्रीमती म्हात्रे.टि.बी. यांनी तर आभार श्रीमती डोंगरे आर.बी.यांनी केले तर या कार्यक्रमासाठी राठोड बी.आर., राऊत आर.आर., राठोड के.बी., पांचाळ के.व्हि.,गोरे ए.पी., श्रीमती जोशी एस.यु., श्रीमती बारगजे एन.एन., श्रीमती गायकवाड एस.ए., श्रीमती भराडे एस.टि., श्रीमती माळी डि.डि.व तिरमले पी.बी आदींनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment