Tuesday, February 18, 2020

कै.र.व.महाविद्यालयात "लोकप्रशासन" विभागा मार्फत 'अग्निपंख' विभागीय स्पर्धा परीक्षा संपन्न !

कै.र.व.महाविद्यालयात "लोकप्रशासन" विभागा मार्फत 'अग्निपंख' विभागीय स्पर्धा परीक्षा संपन्न !







सोनपेठ (दर्शन) :- 

सोनपेठ येथील कै.र.व.महाविद्यालय व वैद्यनाथ महाविद्यालय परळी यांच्या संयुक्त विद्यमाने "लोकप्रशासन" विभागामार्फत आयोजित 'अग्निपंख' या विभागीय स्पर्धा परीक्षेचे आयोजन दिनांक १५ फेब्रुवारी २०२० बुधवार रोजी करण्यात आले होते. भारतीय राज्यघटनेविषयी जनजागृती व्हावी हा उद्देश ठेवून राज्यघटनेवर आधारित ही स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. या स्पर्धा परीक्षेसाठी प्रथम २०००/- ₹ रोख द्वितीय १५००/- ₹ रोख व तृतीय १०००/- ₹ रोख बक्षीस व प्रमाणपत्र ठेवण्यात आले होते. या स्पर्धा परीक्षेत प्रथम क्रमांक कै.र.व.महाविद्यालयाचा विद्यार्थी दिपक जोगडे याने पटकावले.राहुल कारेपुरकर वैद्यनाथ महाविद्यालय परळी द्वितीय तर निमट सचिन श्री पंडित गुरु पार्डीकर महाविद्यालय सिरसाळा व नारायण रोडे कै.र.व.महाविद्यालय सोनपेठ यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. 
    या स्पर्धा परीक्षेत स्वा.रा.ती.म.वि.नांदेड विद्यापीठ व डाँ.बा.आ.औरंगाबाद विद्यापीठातील एकूण 83 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.या स्पर्धा परीक्षेसाठी प्राचार्य डाँ.वसंत सातपुते यांचे मार्गदर्शन लाभले.या स्पर्धा परीक्षेचे आयोजन "लोकप्रशासन" विभाग प्रमुख डॉ.सोमवंशी मुक्ता व डॉ.जाधव अशोक तसेच डॉ.जिजाबाई कांगणे "लोकप्रशासन" विभाग प्रमुख वैद्यनाथ महाविद्यालय परळी यांनी केले.या स्पर्धा परीक्षेसाठी प्रा.डॉ.मुकुंदराज पाटील, प्रा.गोविंद वाकणकर, डॉ.विठ्ठल जायभाये आदिसह सर्व प्राध्यापक व चंद्रपाल पटके आदिंचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment