Friday, February 14, 2020

परभणी भाजपा जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी डॉ. सुभाष कदम यांची निवड

परभणी भाजपा जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी डॉ. सुभाष कदम यांची निवड






परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

परभणी जिल्ह्यात नुकतेच भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयातून आदेश धडकताच परभणी भाजपा जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी डॉ.सुभाष कदम यांची निवड परभणी जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष सोबत घेऊन जिल्हा निवडणूक अधिकारी शिरीष बोराळकर यांच्या शुभहस्ते नियुक्तिपत्र स्वीकारून निवड घोषित होताच संपूर्ण जिल्ह्यामध्ये तसेच सोनपेठ तालुक्यामध्ये "आपला हक्काचा माणूस" योग्य वेळी योग्य पदावर आला अशी भावना परभणी जिल्हा चिटणीस भाजपा शिवाजीराव मव्हाळे यांनी साप्ताहिक सोनपेठ दर्शन प्रतिनिधी जवळ बोलताना सांगितले. डॉ.सुभाष कदम हे धारासुर जिल्हा परिषद चे सदस्य असून त्यांनी अनेक वर्ष भाजपा जिल्हा सरचिटणीस पदाची जबाबदारी सांभाळलेली असून तळागाळातील कार्यकर्त्यांना डॉ.सुभाष कदम हे नेता नसून आपल्यातलाच एक कार्यकर्ता असल्याची भावना अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. नुतन ग्रामीण जिल्हाध्यक्ष परभणी जिल्ह्यामध्ये गावा-गावात वाडी- तांड्यात भारतीय जनता पार्टीच्या शाखांची सुरुवात करून परभणी जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचा सक्षम असा पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न करतील अशी आशा कार्यकर्त्यांमधून व्यक्त होताना दिसत आहे. सोनपेठ तालुक्यातील ज्येष्ठ नेते रमाकांत दादा जागीरदार, परभणी जिल्हा भाजपा चिटणीस शिवाजीराव मव्हाळे, नुतन तालुका अध्यक्ष सुशील रेवडकर आदीसह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व मित्रपरिवार यांच्या वतीनेही शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.डॉ.सुभाष कदम यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होतांना दिसत असून यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होतांना दिसत आहे. 

No comments:

Post a Comment