Thursday, February 27, 2020

कै.र.व.महाविद्यालयात दि.२७ फेब्रुवारी हा जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा

कै.र.व.महाविद्यालयात दि.२७ फेब्रुवारी हा जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा 



सोनपेठ (दर्शन):-  

सोनपेठ येथील कै.र.व.महाविद्यालयात दि.२७ फेब्रुवारी हा जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात आला. याप्रसंगी कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन डाॅ.गणेश मुंढे, संस्थाध्यक्ष मा. परमेश्वर कदम, प्राचार्य डाॅ.वसंत सातपुते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मराठी भाषा संवर्धन करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन मराठी विभागप्रमुख डाॅ.बालासाहेब काळे यांनी केले.मराठीचा नव्या विज्ञान तंत्रज्ञानातील वाढता वापर हे भाषेच्या उत्कर्षाचे लक्षण असल्याचे प्रतिपादन साहित्यिक डाॅ. सा.द. सोनसळे यांनी केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सखाराम कदम यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment