Sunday, February 9, 2020

सोनपेठ येथील छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृह येथे उद्या दि 10 फेब्रुवारी रोजी पहाटे 5 वाजता मोफत योग प्राणायाम शिबिरात सहभाग नोंदवुन निरोगी राहा !

सोनपेठ येथील छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृह येथे उद्या दि 10 फेब्रुवारी रोजी पहाटे 5 वाजता मोफत योग प्राणायाम शिबिरात सहभाग नोंदवुन निरोगी राहा !

 सोनपेठ (दर्शन) :- 

सोनपेठ येथिल जय भवानी   शिवजन्मोत्सव समिती व पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने "छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभाग्रह" येथे 5 दिवसीय मोफत योग प्राणायाम शिबिराचे आयोजन दिनांक 10 फेब्रुवारी 2020 सोमवार रोजी पहाटे 5 वाजता उद्घाटन सौ.जिजाबाई राठोड नगराध्यक्षा, प्रमुख उपस्थिती प.पू.ष.ब्र.श्री 108 नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज, गटनेत्या सौ.सारिकाताई विटेकर, मुख्याधिकारी सौ.सोनमताई देशमुख आदींच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन होणार आहे तरी पंचक्रोशीतील तमाम महिला, पुरुष, तरुण ते अबालवृद्धांनी सहभाग नोंदवून निरोगी जीवन जगण्याची कला अवगत करावी.या मोफत योग प्राणायाम शिबिराचा समारोप दिनांक 14 फेब्रुवारी 2020 बुधवार रोजी होणार असून विशेष भेट या पाच दिवसात प्राचार्य डि.एम.शेप सर, सौ.पुनमताई खत्री तसेच विविध जिल्हास्तरीय  योग शिक्षक भेट देणार आहेत तरी सर्व जनतेने या संधीचा उपयोग घेऊन जीवनाचे सोने करावे असे आवाहन जय भवानी शिवजन्मोत्सव समिती, पतंजली योग समिती व भारत स्वाभिमान न्यासाच्या वतीने करण्यात आली आहे या प्रसंगी शिक्षक म्हणून प्रा.डॉ.विठ्ठल जायभाये, मोहन काका चौलवार, नागनाथ काका सातभाई, नागनाथ काका कोटुळे व अशोक भाऊ कुंभार आदीजण लाभणार आहेत.

No comments:

Post a Comment