Friday, February 21, 2020

वरपुडकर महाविद्यालयात 'पर्यावरणाचा ऱ्हास' या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन

वरपुडकर महाविद्यालयात 'पर्यावरणाचा ऱ्हास' या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन


सोनपेठ (दर्शन) :-
 
सोनपेठ येथील कै.र.व.महाविद्यालय वसुंधरा महाविद्यालय घाटनांदूर, भारतीय सामाजीक शाश्त्रे संशोधन परीषद मुबंई  व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने "पर्यावरणाचा ऱ्हास : कारणे, परिणाम व उपाय" या एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन दि. 22 फेब्रुवारीत 2020 रोजी वरपुडकर महाविद्यालय येथे करण्यात आले आहे. तरी या राष्ट्रीय चर्चासत्रात अनेक संशोधक उपस्थित रहाणार आहेत. 
पर्यावरण ऱ्हासाच्या जागतीक स्तरावरील प्रश्नावरील चर्चासत्रासाठी प्राचार्य डॉ. आर. टी. बेदरे हे मानव संसाधन विकास केंद्र, राजा हरीसिंग गौर केंद्रीय विद्यापीठ सागर मध्यप्रदेश हे उद्घाटक म्हणून उपस्थीत राहणार असुन माजी आमदार व्यंकटराव  कदम हे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. 
 या प्रसंगी संस्था अध्यक्ष परमेश्वर कदम, गोंविंदराव देशमुख यांची उपस्थीती राहणार आहे. या चर्चासत्रात  प्राचार्य डॉ.हरिदास राठोड, डॉ.दयानंद उजळंबे,प्रा.डॉ.रोहीदास कदम यांचे मार्गदर्शन  लाभणार आहे.
तरी जास्तीत विद्यार्थी व प्राध्यापक आणि स्वयंसेवी संस्थांनी यात सहभाग नोंदवावा असे आवाहन प्राचार्य डॉ.वसंत सातपुते,डॉ. ए.वाय.दळवे, प्रा.डॉ.सुनीता टेंगसे,  प्रा. डॉ.मुकुंदराज पाटील, प्रा.जोंधळे यांनी केलेले आहे.

No comments:

Post a Comment