व्हिजन पब्लिक स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ येथील व्हिजन पब्लिक स्कूल व विश्वभारती प्रायमरी स्कूल यांचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले या कार्यक्रमाचे आकर्षण मराठी सिने अभिनेत्री केतकी लांडे व हरिभाऊ कदम (महाराष्ट्र प्रसीध्द फेम संबळ वादक) ठरले, प्रमुख पाहुणे भारत राठोड ( मुख्य कार्यकारी अधिकारी उदगीर), राजेश विटेकर (माजी.जि.प. अध्यक्ष,परभणी),नामदेव पवार, संस्थेच्या अध्यक्षा सारिका पवार मॅडम, सचिव विनोद पवार सर, संस्थेचे प्राचार्य डॉ.पांडुरंग दुकळे सर, उपप्राचार्य भगवान घाटुळ सर, रामेश्वर हुंबे सर (मुख्याध्यापक विश्वभारती प्रायमरी स्कूल) कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ.दुकळे सर यांनी केली. तसेच प्रमुख पाहुण्यांचे शाळेच्या वतीने ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले. तसेच केतकी लांडे यांनी मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले व हरिभाऊ कदम यांनी आपल्या संबळची जादू सर्वांना प्रत्यक्षात दाखवून दिली. तसेच विद्यार्थ्यांनी गणेश वंदना, पोवाडा, हिंदी गाणे, मराठी गाणे, देशभक्ती गाणे, सादरीकरण केले. या बाल चिमुकल्यांच्या नृत्याचा सर्वांनी आनंदी घेतला. शेवटी आभार प्रदर्शन सारिका पवार मॅडम यांनी केले व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी भरपूर मेहनत घेतली व कार्यक्रम यशस्वी पार पाडला.








No comments:
Post a Comment