Tuesday, February 4, 2020

विद्यार्थ्यांमध्ये कौशल्याचा विकास अशा केडर कॅम्प सारख्या शिबीरातून होतो - तहसीलदार डाॅ.अशिषकुमार बिरादार

विद्यार्थ्यांमध्ये कौशल्याचा विकास अशा केडर कॅम्प सारख्या शिबीरातून होतो - तहसीलदार डाॅ.अशिषकुमार बिरादार 
सोनपेठ (दर्शन) :-
कै.र.व.महाविद्यालय व डिघोळ (ई) ग्रामपंचायत कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना विशेष युवक शिबीराचा समारोप कार्यक्रम दि.3 फेब्रुवारी 2020 सोमवार रोजी जिल्हा परीषद प्राथमिक शाळा डिघोळ (ई) येथे संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डाॅ.आशिषकुमार बिरादार म्हणाले की एनसीसी, एनएसएस यासारख्या केडर कॅम्प मधून विद्यार्थ्यामध्ये कौशल्याचा विकास होतो.अशा शिबीरातुन नेतृत्व करण्याची कला विकसित होते. 
       या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार व्यंकटराव कदम हे होते तर प्रमुख उपस्थितीत हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष परमेश्वर कदम, प्राचार्य विठ्ठल घुले, विजयकुमार देशमुख, डिघोळचे सरपंच गोकुळदास आरबाड, प्राचार्य वसंत सातपुते,  उत्तमराव शिंदे, गोपीनाथराव जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. 
       कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या प्रतिमा पुजनाने झाली. कार्यक्रमाधिकारी प्रा.डाॅ. मारोती कच्छवे यांनी शिबीराचा अहवाल सादर केला. तर सर्वेक्षण अहवाल प्रा.डाॅ.मुक्ता सोमवंशी यांनी सादर केला. 
       याप्रसंगी शिबीरात उत्कृष्ट कामगिरी केली म्हणुन स्वयंसेवक शेख अकबर, अशोक कोलते व सीमा राठोड यांचा सत्कार करण्यात आला. तसेच स्वयंसेवकांनी आपले मनोगत व्यक्त केले. यात माणिक धोत्रे, स्वप्निल उबाळे, विजय तूपसमिंद्रे, योगेश कांबळे  ,अर्चना मस्के, प्रज्ञा बोकरे यांनी आपले अनुभव कथन केले. 
    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डाॅ.बापुराव आंधळे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.डाॅ.मुक्ता सोमवंशी यांनी केले. शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रा. गोविंद वाकणकर, प्रा.अजय देशमुख,  सचिन जगदाळे, अक्षय देशमुख, दत्ता नरहारे, प्रा.श्रीकांत गव्हाणे,  प्रशांत शिंगाडे, गणेश पारेकर, बाबुराव फड, संतुक कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले

No comments:

Post a Comment