Friday, February 28, 2020

व्हिजन पब्लीक स्कूल मध्ये विज्ञान दिन उत्साहाने साजरा

व्हिजन पब्लीक स्कूल मध्ये विज्ञान दिन उत्साहाने साजरा


सोनपेठ (दर्शन) :-
 
सोनपेठ येथील व्हिजन पब्लिक स्कूल मध्ये भारतीय शास्त्रज्ञ डाॅ.सी.व्ही.रमण यांच्या सन्मनार्थ २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून उत्साहाने साजरा करण्यात आला.
      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य डॉ.पांडुरंग दुकळे सर होते.व्यासपीठावर उपप्राचार्य भगवान घाटुळ सर उपस्थित होते.
        कार्यक्रमाची सुरूवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली.डाॅ.सी.व्ही रमण यांच्या प्रतिमेचे पूजन व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शाळेच्या गीतमंचाने सौ.स्वाती गित्ते मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञानाचे गाणे हे विज्ञानगीत सादर केले. सदर कार्यक्रम ( इयत्ता ७,८,९ वी ) च्या वर्गाने विज्ञान शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सादर केला. सुरज किशोर सर यांनी विज्ञान दिनाचे महत्व स्पष्ट केले.
      अध्यक्षीय भाषणात दुकळे सर म्हणाले डाॅ.सी.व्ही.रमण यांनी आण्विक विकीरण हा शोध लावला त्यामुळे २८ फेब्रुवारी ला त्यांना नोबेल पुरस्कार प्राप्त झाला.म्हणून २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. आज आपण २१ व्या शतकात जगत आहोत.आधुनिक तंत्रज्ञानाने पुढे असलेल्या शतकात आहोत.विज्ञानदृष्ट्या विकसीत अशा देशात आपण राहतो.आंधळेपणाने एखादी गोष्ट स्विकारणे यास अंधश्रद्धा असे म्हणतात. आपण देवांवर श्रध्दा ठेवावी पण अंधश्रद्धा ठेऊ नये.आज ब-यापैकी लोक हे सुशिक्षित आहेत तरीही काही लोक हे अंधश्रद्धेच्या बाबतीत असुशिक्षीत आहेत.अंधश्रद्धेवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.(७ वी व ८ वी) च्या वर्गातील विद्यार्थ्यांनी वेगवेगळे प्रयोग दाखऊन विद्यार्थ्यांच्या मनातील अंधश्रद्धा नाहीसी केली.
      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयुषा पनुरे, हिने केले तर आभार प्रदर्शन प्रल्हाद निर्मळ सरांनी मार्गदर्शन केले व सर्वांचे आभार व्यक्त केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  विज्ञान शिक्षक सौ.गित्ते मॅडम,सुरज किशोर सर, प्रल्हाद निर्मळ सर,आनंद जाधव सर, पाटील सर, यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास सर्व शिक्षक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment