Friday, February 7, 2020

सोनपेठ तालुक्यातील रस्ते व ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लावा ; विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना शिवाजीराव मव्हाळे यांचे निवेदन

सोनपेठ तालुक्यातील रस्ते व ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लावा ; विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना शिवाजीराव मव्हाळे यांचे निवेदन
परभणी / सोनपेठ (दर्शन) : -

सोनपेठ तालुक्यातील रस्त्यांची अत्यंत वाईट अवस्था, ग्रामीण रुग्णालय सुरु होण्यास होत असलेली दिरंगाई, यासह इतर प्रश्न विधानसभेत उपस्थित करून मार्गी लावण्याचे निवेदन भाजपा जिल्हा चिटणीस शिवाजीराव मव्हाळे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिले.
          परभणी येथे कृषी संजीवनी महोत्सवाचे उद्घाटन करण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आले होते. यावेळी त्यांची भेट घेऊन सोनपेठ तालुक्यातील रस्ते, रुग्णालय, शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत त्यांना लेखी निवेदन देण्यात आले.
          निवेदन देताना झालेल्या चर्चेत शिवाजीराव मव्हाळे यांनी सोनपेठ तालुक्यातील अनेक वर्षांपासून कायम असलेली रस्त्यांची दुरवस्था, ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण होऊन दोन वर्ष उलटली असतानाही रुग्णालय सुरू न झाल्याने रुग्णाचे होणारे हाल या बाबी सांगितल्या.देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रश्न प्रभावीपणे विधानसभेत मांडण्याचे आश्वासन यावेळी दिले.
          निवेदन देताना शिवाजीराव मव्हाळे यांच्या सोबत बबनराव लोणीकर, श्रीहरी खीस्ते, अनंतराव बनसोडे आदी जण उपस्थित होते.

No comments:

Post a Comment