जन्मला येण्याअगोदरच महिला असुरक्षित - मुख्याधिकारी सौ.सोनमताई देशमुख
सोनपेठ (दर्शन) :-
कै.र.व.महाविद्यालय सोनपेठ व डिघोळ ग्रामपंचायत कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबीरामध्ये आज महिला सुरक्षा याविषयावर आपले मनोगत व्यक्त करताना देशमुख मॅडम यांनी महिलांना आपल्या घरात सुरक्षा मिळत नाही. तेव्हा घरात सुरक्षा देवून स्त्री सुरक्षा करणे आवश्यक आहे.
याप्रसंगी बोलताना डाॅ.सुनिता टेंगसे, प्राचार्य शेख शकिला यांनी महिला सुरक्षा याविषयावर आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुनिता कच्छवे या होत्या.याप्रसंगी डिघोळ गावचे सरपंच गोकुळदास आरबाड उपस्थित होते.
याप्रसंगी डिघोळ गावातील सीमा नरहारे, सक्षला हिंगनकर, कोमल दातार महिला यांच्या बरोबर हळदी कुंकू हा कार्यक्रम आयोजित केला होता.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुक्ता यमगर हिने केले तर आभार प्रदर्शन अमोल रणदिवे याने मानले.
No comments:
Post a Comment