Thursday, February 27, 2020

औषधी वनस्पतींच्या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद ; प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध डॉक्टर गणेश मुंडे

औषधी वनस्पतींच्या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद ; प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध डॉक्टर गणेश मुंडे

सोनपेठ (दर्शन) :- 

सोनपेठ येथील कै.र.व.महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने आयोजित औषधी वनस्पतींच्या प्रदर्शनाला तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध डॉक्टर गणेश मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी हशिप्रमंचे अध्यक्ष परमेश्वर कदम, प्राचार्य डाॅ. वसंत सातपुते, आयोजक डाॅ. मुकुंदराज पाटील हे उपस्थीत होते.वनस्पतीशास्त्र विभागाने आयोजीत केलेल्या या प्रदर्शनामध्ये परिसरातील जवळपास पासष्ट औषधी वनस्पतींची माहिती विद्यार्थ्यांकडुन सांगण्यात आली.या प्रदर्शनाला सोनपेठ तालुक्यातील ७५०ते ८०० अभ्यागतांनी भेट दिली. यात  जि. प. शाळा, दहीखेड, मुक्तेश्वर विद्यालय सोनपेठ, एल.आर. के. स्कूल, सोनपेठ, डॉ. झाकीर हुसेन ऊर्दु हायस्कूल सोनपेठ, जि. प. शाळा,वाणीसंगम ई. शाळांचे विद्यार्थी, शिक्षक, नागरीक, पत्रकार आदींचा समावेश होता. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी सहकार्य केले.

No comments:

Post a Comment