Tuesday, February 18, 2020

|| छत्रपती ||

|| छत्रपती ||



नित नवतेज सळसळ
धुरंधर बाणा बांधी पुरंदर
अशी सिंहगर्जना झाली
जन्मले शिवरत्न मानवता उद्धरली!

असे शिवछत्र झळकले
आकाशी तेजोवलय फाकले
वैश्वि विश्वाचे डोळे दिपले
असे जीवनादर्श राज्य थाटले!

व्यथा वेदनांची सल 
पाहून रयतेचे हाल हाल
मनी उठले काहुर बंडाचे
उभारले नवे राज्य रयतेचे!

अशी समशेर तळपली
माय मराठी मनी हरखली
जमविले मावळे कडीकपारी
पेरले बीज गड रायरेश्वरी!

असा जिजाऊ पुत्र शिवबा
रयतेचे गणगोत भाव दाटला
जन मनाच्या हृदयी जागला
त्रिवार प्रणाम त्या शार्दूल सह्याद्रीला!

प्रा.डॉ.विठ्ठल खं.जायभाये
सोनपेठ (१९ फेब्रुवारी २०२०)


No comments:

Post a Comment