सोनपेठ सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी संतोष निर्मळे यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी संतोष निर्मळे तर व्हा.चेअरमन पदी गजानन देशमुख यांची बिनविरोध निवड झाली आहे.
जानेवारी महिन्यामध्ये सेवा सोसायटीच्या १३ सदस्य संख्या असलेल्या संचालक पदासाठी पंचवार्षीक निवडणुका घेण्यात आल्या.
माजी आ.व्यंकटराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुका बिनविरोध पार पडल्या.
चेअरमन पदाच्या निवडी साठी दि. १८ फेब्रुवारी रोजी निवडणूक निर्णय अधिकारी ए. के. कदम यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली,या विशेष सभेत चेअरमन पदी संतोष निर्मळे यांची तिसऱ्याचा बिनविरोध निवड झाली तर व्हा.चेअरमन पदी गजानन देशमुख यांची निवड झाली आहे.
या विशेष सभेला संचालक व्यंकटराव कदम, गोपाळ सारडा, सतीश देशमुख, जितेंद्र वडकर, रामभाऊ भंडारे, वैजनाथ नरहिरे, बालूदेव लोंढे, अंबादास आवाड, ताराचंद बेदमुथा, मंजुबाई शर्मा, संगीता अंभोरे उपस्थित होते.
सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संस्था सचिव अमोल पांडे यांनी काम पाहिले, तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संतोष निर्मळे यांची चेअरमनपदी हॅट्रिक झाल्यामुळे त्यांचे मित्र परिवाराकडून अभिनंदन होत आहे.

No comments:
Post a Comment