हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींचा एन्काऊंटर ; तपासादरम्यान पळून जाणाऱ्या आरोपींवर पोलिसांचा गोळीबार,सोनपेठ तालुक्यातुनही पोलिसांचे अभिनंदन
हैदराबाद / मुंबई / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. पोलीस तपासावेळी पळून जात असताना ओरोपींचा एन्काऊंटर करण्यात आला.हैदराबाद सामूहिक बलात्काराचे चार आरोपी पोलिसांच्या चकमकीत ठार झाले आहेत. ही चकमक राष्ट्रीय महामार्ग -44 जवळ घडली. गुन्हा देखावा पुन्हा मिळवण्यासाठी पोलिसांनी आरोपीला एनएच -44 वर नेले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चारही आरोपींनी घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी चारही आरोपींना ढेर केले आहे. दरम्यान, हैदराबाद जवळील चतनपल्ली गावात गेल्या गुरुवारी २६ वर्षीय डॉक्टर महिलेवर बलात्कार करुन तिची निर्दयीपणे हत्या करण्यात आली. या मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटनेचे देशात तीव्र पडसाद उमटले आहेत. ठिकठिकाणी प्रदर्शने होत आहेत. या प्रकरणी ४ तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. या चारही आरोपींना पोलिसांनी ठार केले आहे.हैदराबाद पोलिसांचे भारतातील तमाम जनतेच्या वतिने तसेच सोनपेठ तालुक्यातील विवीध सामाजीक संघटना, मित्र मंडळ, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, सा.सोनपेठ दर्शन परिवार तसेच सोशल मिडियावर अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसत आहे.
No comments:
Post a Comment