Thursday, December 26, 2019

सोनपेठ येथील कै.र.व.महाविद्यालयात महिलांसाठी राज्यस्तरीय डिजिटल साक्षरता कार्यशाळेचे आयोजन

सोनपेठ येथील कै.र.व.महाविद्यालयात महिलांसाठी  राज्यस्तरीय डिजिटल साक्षरता कार्यशाळेचे आयोजन 
सोनपेठ (दर्शन) :- 

महाराष्ट्र राज्य महिला आयोग व कै.र.व.कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या समाजशास्त्र व इंग्रजी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने  दि.31 डिसेंबर 2019 मंगळवार रोजी महिलांसाठी डिजिटल साक्षरता प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.  ही कार्यशाळा कै.र.व.महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात सकाळी 10 ते दुपारी 3 यावेळेस संपन्न होणार आहे.या कार्यशाळेत सहभागी महिलांना  इंटरनेटच्या साह्याने स्वतःच्या मोबाईलवर शासनाचे विविध धोरणे व योजना शोधणे, विविध प्रकारच्या शासकीय प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करणे,  विविध फॉर्म ऑनलाइन भरणे, डिजिटल बँकिंग करणे,  भीम अँप, गुगल पे, पेटियम यासारख्या विविध ॲपचा  उपयोग करून आर्थिक व्यवहार करणे यासारख्या विविध बाबी शिकवण्यात येणार असून  महिलांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांचा कसा लाभ घेता येईल याचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासाठी राज्य महिला आयोगातर्फे नियुक्त प्रशिक्षक श्रीमती पल्लवी चिंचवडे ( परभणी ) ह्या मार्गदर्शक म्हणुन  येणार आहेत. तसेच महिला आयोगाच्या सदस्या श्रीमती गयाबाई कराड (अंबेजोगाई ), मुख्याधिकारी सोनमताई देशमुख, शौकत पठाण गट शिक्षण अधिकारी, एम.पि.कदम महीला व बालविकास अधिकारी प.स., नसिम सय्यत, डाँ.सुभाष पवार तालुका आरोग्य अधिकारी, संस्थेचे अध्यक्ष परमेश्वर कदम, ऊपाध्यक्षा सौ ज्योतीताई शिंदे (कदम) उपस्थित राहणार आहेत. सदरील प्रशिक्षण पूर्णपणे निशुल्क असुन शहर व परीसरातील  अधिकाधिक महिलांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ. वसंत सातपुते व कार्यशाळा समन्वयक डॉ. सुनिता टेंगसे, सहसमन्वयक डॉ विठ्ठल जायभाये, प्रा पंडीत जोंधळे  यांनी केले आहे. कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या महीलांजवळ स्वत:चा स्मार्टफोन [मोबाईल ] असणे गरजेचे आहे.

No comments:

Post a Comment