वीरशैवांचा 38 दिवसांचा महाकुंभ ; जानेवारी 15 ते 21 फेब्रुवारी 2020 दरम्यान वाराणसी येथे होणार भरगच्च कार्यक्रम श्री काशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजीं यांची माहिती
परळी / सोनपेठ (दर्शन) :- श्री गुरुलिंग स्वामी मठात श्री श्री श्री १००८ ज्ञानसिंहासनाधिश्वर धर्मपिठ काशी डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांना सा.सोनपेठ दर्शन अंक भेट देताना संपादक किरण स्वामी सोबत गुरु श्री ष.ब्र.१०८ नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठकर, दै.लोकतम परळी ता.प्रतिनीधी मा.संजयजी खाकरे आदिंची उपस्थिती होती.
परळी / सोनपेठ (दर्शन) :-
वीरशैव पंचपीठांतील अत्यंत प्राचीन व सुप्रसिद्ध अशा काशीच्या श्री जगद्गुरू विश्वाराध्य ज्ञानसिंहासन महापीठात "श्री जगद्गुरू विश्वाराध्य गुरुकुला'चा शतमानोत्सव समारंभ विविध धार्मिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी जानेवारी 15 ते 21 फेब्रुवारी 2020 दरम्यान होणार आहे. सर्वांनीच या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन श्री काशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींनी परळी येथे आयोजित केलेल्या वीरशैव सामाजाच्या बैठकीत केले आहे.काशी पिठाचे जगदगुरू श्री श्री श्री १००८ ज्ञानसिंहासनाधिश्वर धर्मपिठ काशी डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या उपस्थितीत काशी येथे होणाऱ्या गुरूकुल शतमानोत्सोव निमित्त परळी येथिल संत गुरुलिंग स्वामी मठ संस्थान (बेलवाडी) शनिवारी बैठक घेण्यात आली, श्री गुरु ष.ब्र. १०८ नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठकर, श्री गुरु ष.ब्र. १०८ अमृतेश्वर शिवाचार्य महाराज जिंतुरकर व श्री गुरु ष.ब्र. १०८ बालतपस्वी व्यकटअप्पा शिवाचार्य महाराज पिंपळगावकर यांची ही यावेळी उपस्थिती होती.
या बैठकीस वीरशैव समाजाचे जेष्ठ नेते दत्ताप्पा इटके, विजयकुमार मेनकुदळे, सोमनाथअप्पा हालगे , किर्तीकुमार नरवणे, शिवकुमार व्यवहारे, माणिक हालगे, नारायण खके, रंगनाथ खके, वैजनाथ थोन्टे, चेतन सौंदळे , सुधीर फुलारी, शाम बुद्रे, शिवकुमार निर्मळे, अश्विन मोगरकर , संजय खाकरे, संतोष जुजगर, गोपनपाळे, विकास हालगे, नितीन समशेट्टे, रमेश चौंडे, वैजनाथ बागवाले,नरेश पिंपळे, मनोज येस्के, राजू तिळकरी, सा.सोनपेठ दर्शन संपादक किरण स्वामी यांच्यासह वीरशैव समाजाचे इतर नेते व समाज बांधव उपस्थित होते. प्रभू श्री वैद्यनाथाचे व श्री संत गुरुलिंग स्वामी चे शनिवारी काशी पिठाचे जगदगुरू श्री श्री श्री १००८ ज्ञानसिंहासनाधिश्वर धर्मपिठ काशी डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी दर्शन घेतले. यावेळी त्यांचे श्री वैद्यनाथ मंदिर ट्रस्टच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी मंदिर ट्रस्टचे सचिव राजेश देशमुख, विश्वस्त विजयकुमार मेनकुदळे, प्रा. बाबासाहेब देशमुख,, रघु देशमुख उपस्थित होते. तसेच श्री संत गुरुलिंग स्वामी मठ संस्थानच्या वतीने अध्यक्ष दत्ताअप्पा इटके , सचिव ऍड गिरीश चौधरी, विजयकुमार मेनकुदळे , सोमनाथ अप्पा हालगे यांनी दर्शन घेऊन त्यांचे स्वागत केले.काशी जगद्गुरू डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी पुढे म्हणाले की, काशीपीठातील गुरुकुल हजारो वर्षे प्राचीन असून 1918 साली तत्कालीन पंचपीठाधीश्वर काशीमध्ये आले असताना त्यांनी प्राचीन गुरुकुलाचे "श्री जगद्गुरू विश्वाराध्य गुरुकुल' असे नामकरण केले. त्या नामकरणाला शंभर वर्षे पूर्ण झाली म्हणून शतमानोत्सव साजरा करीत आहोत. त्या गुरुकुलामध्ये काशीपीठाचे 86 पीठाचार्य, केदार पीठाचे 200 पेक्षा अधिक जगद्गुरू तसेच रंभापुरी, उज्जयिनी आणि श्रीशैल पीठाचे अनेक जगद्गुरूसुद्धा पूर्वाश्रमी या गुरुकुलाचे विद्यार्थी होते, ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. या गुरुकुलाच्या शतमानोत्सवाचा शुभारंभ मकर संक्रांतीच्या पर्वकाळी म्हणजे 15 जानेवारी 2020 या दिवशी होणार आहे. या समारंभाचे उद्घाटन कर्नाटकचे ग्रामविकास मंत्री के. एस. ईश्वरअप्पा करणार आहेत. त्यावेळी केंद्र सरकाराचे रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी आणि तेलंगणा-आंध्रांतील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.दैनंदिन धार्मिक कार्यक्रम - रोज सकाळी 6 वाजता मिरवणुकीने गंगेचे अग्रोदक आणले जाईल आणि त्या गंगाजलाने काशीपीठातील श्री विश्र्वनाथ लिंग, श्री जगद्गुरू विश्वाराध्य मूर्ती व पूज्य महास्वामीजी यांचे इष्टलिंग यांना महारुद्राभिषेक केला जाणार आहे. त्याचबरोबर लक्ष बिल्वाचर्र्न, महामंगलारती आणि त्यानंतर महाप्रसाद होईल. रात्री धर्मसभेत विविध विद्वानांची व्याख्याने, मान्यवरांचा सत्कार आणि महास्वामीजींंचे आशीर्वचन होईल. दि.14 फेब्रुवारी रोजी काशीगुरुकुलातील काशी वीरशैव विद्वत्संघाचा हीरक महोत्सव आणि शिवाचार्य महासंमेलन आयोजित करण्यात आले असून त्या कार्यक्रमामध्ये गुरुकुलाचे आजी व माजी विद्यार्थी आणि कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र, तेलंगणा या प्रांतांतील सर्व शिवाचार्य सहभागी होणार आहेत. 16 फेब्रुवारीला श्री ज. पंचाचार्यांच्या भव्य अड्डपालखी महोत्सव होणार असून त्या उत्सवामध्ये शंभरपेक्षा अधिक विविध वाद्यांचे लोककलावंत सहभागी होणार आहेत. या उत्सवात गुलबर्गा (ता. शाखापूर, जि. जेवरगी) येथील तपोवन मठाचे श्री सिद्धाराम शिवाचार्य महाराज 2000 भक्तांसमवेत सहभागी होणार असून उत्सवाची संपूर्ण सेवा त्यांनी स्वीकारलेली आहे.
16 फेब्रुवारीच्या कार्यक्रमाचे उद्घाटन भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी करणार असून त्यांच्या शुभ हस्ते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय 19 भाषांमध्ये अनुवादित झालेल्या वीरशैव धर्मग्रंथ "श्री सिद्धान्त शिखामणी' चे आणि त्याच्या मोबाईल ऍपचे उद्घाटन होणार आहे. या समारंभामध्ये कर्नाटकाचे मुख्यमंत्री मा. बी. एस. येडियुरप्पा आणि अनेक मंत्री, खासदार, आमदार यांच्यासह उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्र आणि तेलंगणाचे आमदार, खासदार आणि विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तसेच अखिल भारत वीरशैव महासभेचे अध्यक्ष डॉ. श्यामनुरू शिवशंकरप्पा आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
No comments:
Post a Comment