महात्मा ज्योतिबाराव फुले शिक्षण परिषद परभणीचे आदर्श शिक्षक पुरस्कार ; सोनपेठ येथील प्रा.बी.व्ही.आंधळे व प्रा.प्रताप राठोड यांना जाहीर
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ येथील कै.र.व.महाविद्यालय सोनपेठ येथे राज्यशास्त्र विभागात कार्यरत असलेले प्रा.डाॅ.आंधळे बापुराव विठ्ठलराव व श्री महालिंगेश्वर कनिष्ठ महाविद्यालयात जीवशास्त्र विभागात कार्यरत असलेले प्रा.प्रतापराव तुकाराम राठोड यांना महात्मा ज्योतिबाराव फुले शिक्षण परिषद परभणी चा जिल्हास्तरावरील आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
महात्मा ज्योतिबाराव फुले शिक्षण परिषद ही शिक्षण परिषद गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या गुणवंत शिक्षकांना त्यांच्या कार्याबद्दल आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करते. यावर्षीच्या पुरस्काराचे वितरण दिनांक 25 डिसेंबर 2019 रोजी कृषी विद्यापीठ परभणी येथे एका कार्यक्रमात हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. या पुरस्कार सोहळ्याचे उदघाटन आ.सुरेशराव वरपूडकर यांच्या हस्ते होणार आहे तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे कुलगुरू मा.अशोक ढवण हे आहेत. यावेळी मा.आ.रामदास बोर्डीकर, आ.राजू भैया नवघरे वसमत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
महात्मा ज्योतिबाराव फुले शिक्षण परिषद परभणीचे जिल्हा स्तरावरील हे पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांचे विविध स्तरातून लोक अभिनंदन करत आहेत.यात हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष परमेश्वर कदम, कोषाध्यक्ष मा.आ.व्यंकटराव कदम, प्राचार्य वसंत सातपुते, श्री महालिंगेश्वर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य पंढरीनाथ जोशी, प्रा.नरवाडकर, आयक्यूएसी समन्वयक प्रा.मुकुंदराज पाटील,प्राचार्य डाॅ.वसंत सातपुते, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.सखाराम कदम, सहशिक्षक नामदेवराव निळे आदींनी अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment