सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा जिल्हाधिकारी कार्यालयात शुभारंभ
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून आयोजित सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात करण्यात आला.. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, श्री.बिबे, शिक्षणाधिकारी श्रीमती वंदना वाहुळ यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
निवासी उपजिल्हाधिकारी श्री.पिनाटे म्हणाले की, जिल्ह्यातील वीर माता व वीर पत्नी यांना शासकीय जमिनीचे वाटप करण्यात आले आहे. सैनिक कल्याण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा वीरमाता, वीरपत्नी व त्यांच्या कुटुंबियांना लाभ देण्याबाबत आम्ही तत्पर असून त्यांना लाभ प्रत्येक सैनिक कुटुंबाला मिळेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यातील विविध कार्यालयात सैनिक गेले असता त्यांच्या समस्या प्रार्थम्याने सोडवण्यात येत असल्याचे सांगून देशप्रेम जागृत राहण्यासाठी सैनिकी शिक्षण महत्वाचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी सर्व मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. तसेच माजी सैनिकांच्या पाल्यांनी उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी केल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. गतवर्षीच्या ध्वजदिन निधी अंतर्गत 100 टक्के उद्दिष्ट पुर्ण केलेल्या कार्यालय प्रमुखांचा यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच जिल्हा महसुल संघटना व जिल्हा तलाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमातील उपस्थितांना सशस्त्र सेना झंडा दिवसाचे बॅचेस लावण्यात आले आणि ध्वजदिन निधीत सहभाग देणाऱ्याकडून निधी संकलीत करण्यात आला. या कार्यक्रमास आजी व माजी सैनिक, वीर माता, वीर पत्नी, सैनिकी शाळेचे विद्यार्थी तसेच विविध विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment