व्हिजन पब्लिक स्कूल येथे "ख्रिसमस डे" साजरा
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ विटा रोड स्थीत व्हिजन पब्लिक स्कुल येथे दि.25 डिसेंबर 2019 बुधवार रोजी "ख्रिसमस डे" चे औचित्य साधून शाळेचे शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी यांनी मिळून साजरा केला ख्रिसमस डे या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संस्थेचे प्राचार्य डॉ.पांडुरंग दुकळे, प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य भगवान घाटुळ उपस्थित होते सर्वप्रथम शाळेचे शिक्षक सुरज किशोर सर यांनी क्रिसमस डे चे महत्व व क्रिसमस डे ची माहिती सर्व विद्यार्थ्यांना सांगितली त्यानंतर त्यांनी स्वतः व महेश पाटील यांनी बसवलेले विद्यार्थ्यांचे दोन स्किट व डान्स याचे सादरीकरण झाले यानंतर मोठ्या डोलात नाचत वाजत गाजत सॅन्थाक्लॉज याचे आगमन झाले याने विद्यार्थ्यांना डान्स करत खाऊ चॉकलेटची बरसात केली मोठ्या रंगात झालेला हा कार्यक्रम शेवटी केक कट करून यशस्वी पार पडला या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी फार मोलाचे योगदान दिले यात परी सॅन्थाक्लॉज व वेगवेगळे वेषांतर करून सादरीकरण केले अशाप्रकारे हा क्रिसमस डे साजरा करण्यात आला.यावेळी सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गासह सर्व विध्यार्थी यांनी सहभाग नोंदवून कारेक्रमाची शोभा वाढवली.
No comments:
Post a Comment