"नववर्षानिमित्त युवकांनी देशासाठी योगदान देण्याचा संकल्प करावा" - शिवाजी माव्हाळे
सोनपेठ (दर्शन) : -
राजीव गांधी महाविद्यालयात आयोजित नववर्ष स्वागत समारंभ प्रसंगी बोलताना माननीय शिवाजी माव्हाळे म्हणाले की, "आज भारत हा युवकांचा देश असून, युवकांनी देशासाठी योगदान देण्याचा नववर्षानिमित्त संकल्प करावा. डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी 2020 सली भारत हा महासत्ता असेल अशी आशा व्यक्त केली होती. 2020 या येणाऱ्या नव्या वर्षात युवकांनी डॉ.कलाम यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे.
राजीव गांधी महाविद्यालयात विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाचे स्वागत करण्या साठी दुपारी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांच्या जल्लोषात मा.शिवाजी मव्हाळे यांच्या हस्ते केक कापून कार्यक्रमास सुरुवात झाली. या प्रसंगी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले की, "आज भारत हा युवकांचा देश असून, युवकांनी देशासाठी योगदान देण्याचा नववर्षानिमित्त संकल्प करावा. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी 2020 सली भारत हा महासत्ता असेल अशी आशा व्यक्त केली होती. 2020 या येणाऱ्या नव्या वर्षात युवकांनी डॉ. कलाम यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे.अविरत मेहनत घेऊन महाविद्यालयाचे व देशाचे नाव मोठे करावे" शेवटी प्राचार्य बालाजी शिंदे यांच्या अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाचा समारोप झाला.कार्यक्रमास महाविद्यालयातील प्रा.शेख, प्रा. कांबळे , प्रा.किरवले, दिक्षा शिरसाठ यांच्या सह सर्व कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन B.C.A. प्रथम वर्षाचा विद्यार्थी ज्ञानेश्वर कदम याने केले. तर शेवटी कैलाश भालेराव यांनी आभार प्रदर्शन केले.
No comments:
Post a Comment