Sunday, December 1, 2019

पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांचा पुण्यात असाही सत्कार ; एक लाखाची थैली देऊन कृतज्ञता

पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक 
एस.एम.देशमुख यांचा पुण्यात असाही सत्कार ; एक लाखाची थैली देऊन कृतज्ञता
पुणे / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक आणि मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम.देशमुख यांच्या अथक प्रयत्नांमुळेच पत्रकार पेन्शन आणि पत्रकार संरक्षण कायदा हे दोन्ही पत्रकारांचे जिव्हाळ्याचे प्रश्न मार्गी लागले. त्यांनी राज्यातील पत्रकारांसाठी केलेल्या या एेतिहासिक कार्याबद्दल त्यांना एक लाख रूपयांची थैली देऊन त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे.. ३डिसेंबर २०१९ रोजी पुणे येथे हा सन्मान सोहळा होत आहे.. यावेळी एस.एम.देशमुख यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारया किरण नाईक यांचाही सत्कार करण्यात येणार आहे..
राज्यातील वयोवृद्ध पत्रकारांना पेन्शन मिळावी यासाठी एस.एम.देशमुख गेली २५ वर्षे प्रयत्न करीत होते.. तो प्रश्न नुकताच मार्गी लागला आहे.. राज्यातील पत्रकारांवरील हल्ल्याचे प़माण प्रचंड वाढले होते.. त्याची चिंता सर्वानाच होती.. हे थांबवायचे असेल तर पत्रकारांना कायदेशीर संरक्षण मिळाले पाहिजे अशी मागणी प्रथम २००५ मध्ये एस.एम.देशमुख यांनी केली.. त्यानंतर त्यासाठी एस.एम.देशमुख, किरण नाईक यांनी महाराष्ट्रव्यापी चळवळ उभी केली.. १४ वर्षांच्या सततच्या लढ्यासाठी अखेर ८ नोव्हेंबर रोजी पत्रकार संरक्षण कायदा महाराष्ट्रात लागू झाला.. हा कायदा व्हावा यासाठी एस.एम.देशमुख यांनी पत्रकारितेतील उज्ज्वल करिअर पणाला लावले.. पत्रकारांना कायदेशीर संरक्षण मिळवून दिलयाबद्दल कृतज्ञता व्यक्त व्यक्त करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येत आहे.. एक लाखाची थैली, मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ असे या सत्काराचे स्वरूप आहे.. यावेळी किरण नाईक यांचाही गौरव करण्यात येणार आहे..
मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापनदिनी ३ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता पत्रकार भवन, नवी पेठ पुणे येथे हा सत्कार सोहळा होणार आहे..
या सत्कार सोहळ्यास राज्यातील पत्रकारांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे, पुणे विभागीय सचिव बापुसाहेब गोरे आणि पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर यांनी केले आहे...

No comments:

Post a Comment