Monday, December 16, 2019

सोनपेठ तालुक्यातील खडका येथे विविध विकास कामाचे शिवाजीराव मव्हाळे यांच्या हस्ते उदघाटन

सोनपेठ तालुक्यातील खडका येथे विवीध विकास कामाचे शिवाजीराव मव्हाळे यांच्या हस्ते उदघाटन 
सोनपेठ (दर्शन) :- 
सोनपेठ तालुक्यातील मौजे खडका ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकासकामांचे उदघाटन भाजपाचे परभणी  जिल्हा चिटणीस शिवाजीराव मव्हाळे यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले. शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून खडका या गावाचा कायापालट करण्यासाठी शिवाजीराव मव्हाळे यांनी प्रयत्न केले असून मागील ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वावर खडकावासीयांनी विश्वास ठेवून त्यांना साथ दिली होती. यावेळी त्यांनी ग्रामस्थांना अभिप्रेत असणारी ग्रांमपंचायत करण्याचा संकल्प केला होता. यातून त्यांनी दलित वसाहतीमधील कामे, तांडा वस्ती सुधारणा योजनेतुन कामे करत ४९ लक्ष रुपयांच्या विवीध विकास कामास सुरुवात केली आहे. या कामाचे उदघाटन नुकतेच संपन्न झाले यावेळी या कार्यक्रमाला रामप्रसाद यादव, पांडुरंग यादव, राकेश यादव, भागवत यादव, किर्तेश्वर यादव, कनीराम चव्हाण, काशिनाथ जाधव, सुभाष जाधव, आणि ग्रामसेवक देशपांडे आदीसह ग्रामस्त उपस्थित होते.

No comments:

Post a Comment