एस.एम.देशमुख यांचे पत्रकारितेबरोबरच सामाजिक योगदान मोठे - कुमार सप्तर्षी यांचे प्रतिपादन ; देशमुखांनी पत्रकारांसाठी संघर्ष केला - भरतकुमार राऊत
पुणे / प्रतिनिधी
पत्रकारितेबरोबरच सामाजिक चळवळीत वाहून घेत एस.एम. देशमुख यांनी मोठे काम उभे केले आहे. त्यांच्या संघर्षामुळेच पत्रकारांसाठी विविध योजना व कायदे निर्माण होऊ शकले असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत कुमार सप्तर्षी यांनी केले. तर पत्रकारिता व व्यापक चळवळ यामुळेच एस.एम. देशमुख हे देशभरात पोहचले, यातून चांगले परिणाम दिसत असल्याचे मत ज्येष्ठ संपादक तथा माजी खा.भारतकुमार राऊत यांनी व्यक्त केले.
पुणे येथील पत्रकारांच्या वतीने मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी माजी खा.भारतकुमार राऊत, ज्येष्ठ सामाजिक विचारवंत, माजी आमदार डॉक्टर कुमार सप्तश्री, सत्कारमुर्ती पत्रकार संरक्षण कायद्याचे जनक तथा मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष गजानन नाईक, जेष्ठ पत्रकार निशिकांत भालेराव, जेष्ठ पत्रकार अरुण खोरे,कार्याध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस संजीव जोशी, महाराष्ट्र शासनाचे माजी माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलतांना भारतकुमार राऊत म्हणाले, एस.एम. देशमुखांची पत्रकारांसाठीची चळवळ म्हणजे झपाटलेले झाड आहे. त्यांनी पत्रकारांसाठी वाहून घेत मोठे काम केले आहे. त्यांचे या क्षेत्रातील योगदान अमुल्य असे आहे. पत्रकारितेसारख्या क्षेत्रात काम करतांना पत्रकारांना संरक्षण मिळणे आवश्यक आहे, तो कायदा संमत करुन घेण्यासाठी एस.एम. देशमुख यांनी सातत्याने पाठपुरावा केला. संघटना चालवणे,मोर्चे काढणे हे पत्रकारांचे काम नसले तरी त्यांनी संघटनेचे काम करत पत्रकारांचे प्रश्न आणि त्याबरोबरच सामाजिक काम करण्याचे मोठे काम केले. अशा पत्रकारांचा सन्मान होणे ही अभिमानाची बाब आहे. मुंबई-गोवा महामार्गासाठीही त्यांनी सामाजिक दायित्वातून लढा उभारल्याची आठवण भारतकुमार राऊत यांनी सांगितली. यावेळी कुमार सप्तर्षी यांनीही एस.एम. देशमुख यांच्या कार्याचा गौरव करत सद्यस्थितीत पत्रकारांसमोर असलेल्या आव्हानांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमास कोषाध्यक्ष विजय जोशी, उपाध्यक्ष यशवंत पवार, उपाध्यक्ष सुरेश नाईकवाडे, राज्य कार्यकारिणी सदस्य अनिल वाघमारे, बीड जिल्हा सरचिटणीस विलास डोळसे सह आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरद पाबळे, सूत्रसंचालन सोशल मीडिया सेल निमंत्रक बापुसाहेब गोरे तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील लोनकर सह टिमने काम पाहिले.
--------
कोट.....
सत्काराला उत्तर देताना मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम.देशमुख म्हणाले की पत्रकार परिषदेने पत्रकारांच्या न्याय प्रश्नांसाठी आक्रमक होत रस्त्यावर येऊन आंदोलने केली. त्यास राज्यभरातून प्रतिसाद मिळाला आणि पत्रकार संरक्षण कायदा, पत्रकार सन्मान योजना, यासारखे प्रश्न मार्गी लागले. एवढ्यावरच न थांबता पत्रकारांच्या प्रश्नावर परिषद आता पुन्हा एकजुटीने लढा देण्यास सज्ज झाली आहे. आपलं हे सगळं राज्यातील सर्व पत्रकारांचे यश आहे. राज्यभरातील पत्रकारांच्या या प्रेमामुळे मी भारावून गेलो आहे. असेच प्रेम आणि लोभ पत्रकारांनी ठेवावा. आणि परिषदेची वाटचाल अशीच अधिक गतिमान पद्धतीने करावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
पत्रकारांनी आपल्या गरजा मर्यादित ठेवल्या तर कोणासमोर हात पसरण्याचा वेळ येत नाही.. आयुष्यात मी हे पथ्य पाळले.. त्यामुळेच नोकरी सोडल्यानंतर अनेकदा आर्थिक अडचणी आल्या पण मला कोणासमोर हात पसरण्याची वेळ आली नाही.. मी स्वाभिमानाने आणि ताठमानेनं जगलो..अर्थात राज्यातील पत्रकारांची आणि माझ्या कुटुंबाची साथ मिळाल्यामुळे चळवळीत मी थोडं फार काम करू शकलो असं मत त्यांनी व्यक्त केलं..
पत्रकारांनी सामाजिक जबाबदारीचं भान ठेऊन काम करावं, केवळ घडलेल्या बातम्यांचे वृतांत देणं एवढंच आपलं काम नाहीत तर लोकांचे प्रश्न, होणारे अन्याय या विरोधात लेखणीच्या माध्यमातून आणि प्रसंगी रस्त्यावर उतरून आवाज उठविणे हे पत्रकारांचे काम आहे.. या भूमिकेतूनच कोकणातील पत्रकारांनी मुंबई गोवा महामार्गासाठी लढा उभारला आणि तो तडीस नेला.. ही दृष्टीकोण डोळ्यासमोर ठेऊनच मराठी पत्रकार परिषद काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.. माझ्या गावात सकाळच्या माध्यमातून मोठा बंधारा बांधून माझी जन्मभूमी कायमस्वरूपी पाणी टंचाई मुक्त करण्यात मला यश आलं त्याबद्दल मी स्वतः भाग्यवान समजतो असेही त्यांनी स्पष्ट केले
पुणे जिल्हा पत्रकार संघाने दिलेल्या एक लाखाच्या थैलीचा उपयोग मी चळवळीसाठी करणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
No comments:
Post a Comment