वै.ब्र.ब्र.श्री रंगनाथ महाराज गुरुजी सोनपेठकर 50 वी पुण्यतिथी सुवर्ण महोत्सवात सहभागी व्हा !
सोनपेठ (दर्शन) :- श्री.ह.भ.प.वै.ब्रिजलालजी महाराज भुतडा यांच्या प्रेरणेने प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी सोनपेठ नगरी मध्ये भव्यदिव्य अखंड हरीनाम सप्ताहचे आयोजन करण्यात आले आहे.या महोत्सवात विविध कार्यक्रमाचे आयोजन सप्ताह समिती व समस्त ग्रामस्त यांच्या तर्फे करण्यात आले आहे. पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी श्री गुरुजींच्या सुवर्ण उत्सवाचा आवश्य लाभ घ्यावा या महोत्सवाचे साक्षीदार व्हा. प्रारंभ १६ डिसेंबर २०१९ सोमवार, भव्य दिंडी मिरवणुक, २२ डिसेंबर २०१९ रविवार, सांगता २३ डिसेंबर २०१९ सोमवार रोजी होनार आहे. ठिकान श्री नगरेश्वर मंदीर,सोनपेठ.
विशेष उपस्थितीत आ.सुधीर मुनगंटीवार (माजी अर्थमंत्री महाराष्ट्र राज्य), मदन येरावार (माजी आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य), आ.समीर कुनावार (आमदार हिंगणघाट), नंदकुमार गादेवार (अध्यक्ष आर्य वैश्य महासभा महाराष्ट्र) तसेच भानुदास वट्टमवार, संजय पेकम, माजी आमदार व्यंकटराव कदम, दिलीप कंदकुर्ते, किरण वट्टमवार, राजेश विटेकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, एकनाथ मामडे, शिरीष पारसवार, मदन सातभाई, किशोर पारसेवार, प्रदीप कोकडवार, डॉ.सचिन लादे, दत्तराव कदम उपनगराध्यक्ष, लक्ष्मीकांत कोल्हे, दिगांबर गडम, रमाकांत जहागीरदार, सुधीर पाटील, गोविंद बिडवई व सर्व सन्माननीय सदस्य, सदस्या नगर परीषद सोनपेठ याप्रसंगी सांप्रदायीक कार्यक्रम प्रवचन दुपारी ४ ते ५ प्रवचनकार अनुक्रमे ह.भ.प.महेश महाराज चैतन्य, ष.ब्र.१०८ श्री गुरु नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज, ह.भ.प.चंद्रहंस शास्त्री महाराज, ह.भ.प.रसानंद महाराज पुरीजी, ह.भ.प.बाळुगुरु आसोलेकर महाराज. तर कीर्तन रात्रौ ९ ते ११ कीर्तनकार अनुक्रमे विद्वतरत्न गाथामुर्ती ह.भ.प.चंद्रशेखर महाराज, ह.भ.प.वेदांताचार्य जयवंत महाराज बोधले, विदर्भरत्न ह.भ.प.संजय महाराज पाचपोर, वारकरी भूषण उमेश महाराज दशरथे, ह.भ.प.अनिल महाराज पाटील, ह.भ.प.योगीराज महाराज गोसावी, प्रज्ञाचक्षू ह.भ.प.मुकुंद काका जाटदेवळेकर तर दि.२३ डिसेंबर सोमवार रोजी सकाळी १० ते १ ह.भ.प.अम्रताश्रम स्वामी महाराज यांचे काल्याचे कीर्तन व संगीत भजन, गोमाता पुजन. विशेष आकर्षण विवीध सामाजिक कार्यक्रमात दि.१७ डिसेंबर मंगळवार रोजी दुपारी १ ते ४ अँड.अपर्णाताई रामतिर्थकर (समस्त स्त्री व पुरुषांनी आवर्जून ग्रहण करावा असा) , दि.१८ डिसेंबर बुधवार रोजी दुपारी १ ते ४ आरोग्य शिबिरात र्हदयरोग, मधुमेह, किडनी विकार, स्त्रीरोग, अस्थिरोग, नेत्ररोग, त्वचारोग तज्ञ डाँक्टर्स लाभनार आहेत तसेच दि.२० डिसेंबर शुक्रवार रोजी दुपारी १ ते ४ भव्य रक्तदान शिबिर होनार आहे याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे अवाहन आर्य वैश्य समाज व समस्त गावकरी मंडळ सोनपेठ यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment