नांदेड जिल्ह्यात पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत पहिला गुन्हा दाखल
साप्ताहिक सोनपेठ दर्शन संपादक किरण रमेश स्वामी मो.9823547752.
नांदेड / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
द पॉवर ऑफ मीडिया माहूरचे तालुका उपाध्यक्ष कार्तिक बेहेरें यांना वाई बाजार येथील खान कंस्ट्रक्शनचे मालक तथा उपसरपंच हाजी उस्मान खाँ चाँद खाँ पठाण यांनी रस्ता दुरुस्तीच्या कामात माती मिश्रित रेती (नाल्याची वाळू )वापरल्याची तक्रार संबधित अभियंता महामुने यांचे कडे का केली म्हणून गावराळ भाषेत शिवीगाळ करून मारहाण करण्यासाठी अंगावर धावून गेल्या प्रकरणी कार्तिक बेहेरे यांनी दि.२८ डिसें. रोजी दिलेल्या तक्रारीवरून सिंदखेड पोलिसांनी हाजी उस्मान खाँ चाँद खाँ पठाण यांचे विरुध्द भादवि 294,506 व पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत अधि. 3 व 4 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
समाजावर होणारे अन्याय,अत्याचाराला वाचा फोडल्याने तसेच ,शासकीय विकास कामात होणारी अनियमितता व बेकायदेशीर धंद्यावर आळा बसावा म्हणून आपले कर्तव्य बजावत असतांना कळत-नकळत समाजातील काही मंडळीच्या हिताला बाधा पोहचल्याने अनेक पत्रकारांना आपला प्राण गमवावा लागला तर काहींना झालेली गंभीर दुखापत लक्षात घेवून शासनाने दि.8 नोव्हें. 2019 रोजी पत्रकार संरक्षण कायदा अस्तित्वात आणला.त्या अंतर्गत सिंदखेड पोलीसांनी उस्मान खाँ यांचेवर दाखल केलेला माहूर तालुक्यातील हा पहिला गुन्हा आहे.
No comments:
Post a Comment